Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : दोन्ही सलामीवीरांच्या दुखापतीनंतर रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार,...

IND vs ENG : दोन्ही सलामीवीरांच्या दुखापतीनंतर रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार, जाणून घ्या…


नवी दिल्ली : पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच भारताचे शुभमन गिल आणि मयांक अगरवाल हे दोन्ही सलामीवीर दुखापतग्रस्त झाले आहेत. गिल तर आता या दौऱ्यातच खेळणार नाही. पण उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण येणार, ही गोष्ट आता जवळपास स्पष्ट झाली आहे.

गिल आणि अगरवाल यांच्या दुखापतीनंतर रोहितबरोबर सलामीला कोणाला पाठवायचं, हा प्रश्न आता भारतीय संघाने सोडवलेला आहे. काही दिवसांपूर्वी हनुमा विहारी आणि लोकेश राहुल यांच्या नावाचा विचार भारतीय संघ करत होता. पण आता या सामन्यासाठी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलला जास्त पसंती देण्यात येणार असल्याचे समजते आहे. कारण राहुलने यापूर्वीही भारताच्या सलामीची धुरा सांभाळली आहे. त्याचबरोबर राहुल हा रिषभ पंतला चांगला पर्यायही ठरू शकतो. कारण जर पंतला दुखापत झाली किंवा काही कारणास्तव त्याला संघाबाहेर जावे लागले तर राहुल हा यष्टीरक्षणाची धुराही सांभाळू शकतो. त्यामुळे राहुलला यावेळी संधी देण्यात येईल. पण राहुलकडून जर चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही तर विहारीला संघात स्थान मिळू शकते. भारतापुढे हा प्रश्न फक्त १-२ सामन्यांचा आहे. कारण मयांक अगरवाल हा पहिल्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यानंतर पृथ्वी शॉ हा संघाच्या सरावा उपस्थित राहणार आहे. त्यामुळे भारतासाठी सलामीचे चांगले पर्याय उपलब्ध असतील. त्यामुळे पहिल्या सामन्यात विहारीपेक्षा राहुलला पसंती देऊन त्याला हा सामना खेळण्याची संधी देण्यात येऊ शकते, असे संकेत आता मिळत आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात भारताची कामगिरी कशी होते आणि विराट कोहली कसे नेतृत्व करतो, याकडे सर्वांचेच लक्ष यावेळी लागलेले असेल यात शंकाच नाही.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #दनह #सलमवरचय #दखपतनतर #रहत #शरमबरबर #सलमल #कण #यणर #जणन #घय

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

पुण्यात चंद्रकांत पाटील नाही तर राज्यपालच करणार15 ऑगस्टला ध्वजारोहण

Pune independence day 2022: पुण्यात (Pune)15 ऑगस्टचे ध्वजारोहण कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील  पुण्याऐवजी कोल्हापूरला (Kolhapur) करणार आहेत. तसं...

Nashik मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग झाला, आता याच मार्गावर बुलेट ट्रेन : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danev : मुंबई ते नागपूर समृद्धी (Mumbai Nagpur Highway) महामार्ग पूर्णत्वास असून त्याच मार्गावर आता हायस्पीड बुलेट...

वाढदिवस साजरा करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस थेट पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. तिने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांची मने जिंकली आहेत.  ती...

बाळूमामांचे बोल खरे ठरणार; दैवी सामर्थ्याने पाटलाचा अहंकार नष्ट होणार

मुंबई, 12 ऑगस्ट : महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. अनेक संतांनी मिळून महाराष्ट्र भूमी पावन बनवली आहे.  याच संत परंपरेमधील एक...

अनुष्काचा सिनेमा १५ वेळा पाहिला, डोक्यात एकच खूळ, शेवटी २० लीटर पेट्रोल अंगावर ओतून पेटवलं

बंगळुरु: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा अरुंधती हा चित्रपट पाहून एका २३ वर्षीय तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने आत्महत्या केली आहे. ही घटना कर्नाटकातील...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावरील FBI ची छापेमारी Nuclear कागदपत्रांच्या शोधासाठी, खळबळजनक खुलासा

Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर...