Saturday, July 2, 2022
Home क्रीडा IND vs ENG : दुसऱ्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, विराट कोहलीपुढे...

IND vs ENG : दुसऱ्या सामन्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ, विराट कोहलीपुढे मोठा प्रश्न…


नवी दिल्ली : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ११ जणांचा संघ कसा निवडायचा हा प्रश्न कर्णधार विराट कोहलीपुढे नक्कीच पडला असेल.

नेमकं घडलंय तरी काय, पाहा…
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारताचा सलामीवीर मयांक अगरवाल हा दुखापतग्रस्त झाला होता आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. मयांक सामना खेळणार नाही हे कळल्यावर लोकेश राहुलला पहिल्या कसोटीत रोहित शर्माबरोबर सलामीसाठी पाठवण्यात आले. राहुलने यावेळी पहिल्या डावात सर्वाधिक ८४ धावाही केल्या. पण आता दुसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाची संघ निवडण्याची चिंता वाढली आहे. कारण आता मयांक पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे त्याला आता कोणाच्या जागी संधी द्यायची, हा मोठा प्रश्न असेल. या मालिकेच्या सुरुवातीला राहुल हा मधल्या फळीतील फलंदाज आहे, असे विराट कोहलीने सांगितले होते. मयांक दुखापतग्रस्त झाल्यामुळे राहुलला सलामीची संधी मिळाली, पण आता मयांक फिट झाल्यावर सलामीला कोण येणार, हा प्रश्न कोहलीला सोडवावा लागणार आहे. मयांकला जर सलामीला आणले तर राहुलला कुठे खेळवायचे, हादेखील एक मोठा प्रश्न असेल. कारण आपण फॉर्मात आल्याचे राहुलने दाखवून दिले आहे, त्यामुळे त्याला संघातून वगळणे कोहलीसाठी सोपे नसेल. त्यामुळे आता कोहली, रवी शास्त्री यावर का तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कदाचित एक प्रयोग म्हणून लोकेश आणि मयांक या दोघांनाही खेळवण्यात येईल. राहुल सलामीला येऊ शकतो आणि मयांक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. पण त्यासाठी संघातून चेतेश्वर पुजाराला काढण्याचा निर्णय कोहली आणि शास्त्री यांना घ्यावा लागू शकतो. त्यामुळे हा पुजाराला संघाबाहेर बसवण्याचा मोठा निर्णय शास्त्री आणि कोहली घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्याचबरोबर भारतीय संघात आर. अश्विनचे पुनरागमन होणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा, लोेश राहुल, मयांक अगरवाल/ चेतेश्वर पुजारा, विराट कोहही, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन/ शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #दसऱय #समनयपरवच #भरतय #सघचय #अडचणत #वढ #वरट #कहलपढ #मठ #परशन

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha

<p>सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण...

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी...

State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

<p class="title style-scope ytd-video-primary-info-renderer">State Wrestling Association : शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त</p> <p id="info" class="style-scope ytd-video-primary-info-renderer">&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, गेल्या 24 तासांत 17 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Corona Cases in India : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत...

वारंवार Sex करण्याची सवय असणं म्हणजे आजार आहे का?

वारंवार लैंगिक संबंध ठेवण्याच्या व्यसनाला आजार म्हटलं जाऊ शकतं का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

मशरूमच्या या फोटोंमध्ये लपलाय एक उंदीर, तुमच्या नजरेला सापडतोय का?

नुकतंच व्हायरल झालेल्या Optical Illusion फोटो असंच काही आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...