Saturday, August 13, 2022
Home क्रीडा IND vs ENG : टीम इंडियात आलबेल नाही? रहाणेबाबत गावसकरांचा खळबळजनक आरोप

IND vs ENG : टीम इंडियात आलबेल नाही? रहाणेबाबत गावसकरांचा खळबळजनक आरोप


टीम इंडियामध्ये (Team India) सगळं काही आलबेल आहे का नाही? हा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलेले खळबळजनक आरोप.

टीम इंडियामध्ये (Team India) सगळं काही आलबेल आहे का नाही? हा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलेले खळबळजनक आरोप.

नॉटिंघम, 3 ऑगस्ट : टीम इंडियामध्ये (Team India) सगळं काही आलबेल आहे का नाही? हा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण म्हणजे भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी केलेले खळबळजनक आरोप. टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) डच्चू मिळणार असल्याचे संकेत सुनिल गावसकरांनी दिले. टीममध्ये रहाणेविरुद्ध अभियान चालवलं जात आहे. चेतेश्वर पुजाराचं (Cheteshwar Pujara) नाव यामध्ये ओढलं जात आहे, कारण निशाणा अजिंक्य रहाणे आहे हे दिसू नये, असं गावसकर एका मुलाखतीमध्ये म्हणाले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना गावसकर म्हणाले, ‘इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रहाणे आणि पुजारावर दबाव असेल, कारण टीममधली यांची जागा धोक्यात आहे. या दोघांसोबत हे अनुचित आहे, कारण अनेक वर्ष ते भारतीय क्रिकेटची सेवा करत आहेत. टीमच्या चांगल्या कामगिरीसाठी त्यांनी जीवाचं रान केलं. मागच्या 6 महिन्यात त्यांची कामगिरी शानदार झाली. रहाणे आणि पुजाराला टीममधून बाहेर करण्यासाठी मोहीम चालवली जात आहे, हे चुकीचं आहे.’
‘मागच्या 6-8 महिन्यात कोणी रन केले आहेत, हे मला सांगा. पुजारा फक्त मोहरा आहे, असली शिकार रहाणे आहे. पुजाराचं नाव या वादामध्ये आणलं जात आहे, कारण जगाला असं वाटू नये की रहाणेवर निशाणा साधला जात आहे. पुजाराचं नाव घेतलं जात आहे, पण खरं टार्गेट अजिंक्य रहाणेच आहे. रहाणेला गुंतवणूक म्हणून बघा, त्याला धोका समजू नका. पण उलट होत आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, हे तुम्हाला कळत आहे,’ असं विधान गावसकरांनी केलं. इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये त्यांनी टीमच्या दिग्गज खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले.
‘अजिंक्यने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या 36 रनवर ऑल आऊट झाल्यानंतर शतक केलं. ब्रिस्बेन टेस्टमधल्या ऐतिहासिक विजयातही आव्हानाचा पाठलाग करताना रहाणेने महत्त्वाची भूमिका निभावली होती. इंग्लंडविरुद्ध स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर रहाणेने अर्धशतक केलं. फायनलमध्येही तो भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. तरीही रहाणे आणि पुजारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामागे काय हेतू आहे, ते पाहिलं पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर विराट कोहलीने टीमच्या बॅट्समनविषयी प्रश्न उपस्थित केले होते. विराटने अप्रत्यक्षपणे पुजारा आणि रहाणेवर निशाणा साधला होता. विराटने टीममध्ये पूर्णपणे बदलाचे संकेत दिले होते. ‘आम्हाला पुनर्म्यूल्यांकन करावं लागेल आणि पुन्हा योजना बनवावी लागेल. निडर होऊन खेळण्याची गरज आहे. योग्य व्यक्तींना टीममध्ये आणावं लागेल, ज्यांच्याकडे कामगिरी करण्याची योग्य मानसिकता आहे,’ असं विराट म्हणाला होता.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #टम #इडयत #आलबल #नह #रहणबबत #गवसकरच #खळबळजनक #आरप

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...