Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG : गावसकरांनी इंग्लंडची 'इज्जत'च काढली; लॉर्ड्स टेस्टनंतर डिवचलं!

IND vs ENG : गावसकरांनी इंग्लंडची ‘इज्जत’च काढली; लॉर्ड्स टेस्टनंतर डिवचलं!


गावसकरांचा इंग्लंडच्या टीमवर निशाणा

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध (India vs England Second Test) लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. लॉर्ड्स टेस्टनंतर भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडच्या टीमवर निशाणा साधला.

लंडन, 17 ऑगस्ट : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध (India vs England Second Test) लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा 151 रनने पराभव केला. अखेरच्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 272 रनचं आव्हान दिलं होतं, पण 120 रनवरच इंग्लंडचा ऑल आऊट झाला. या विजयासह भारताने 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. या दोन्ही टीममधली नॉटिंघममध्ये झालेली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली.
लॉर्ड्स टेस्टनंतर भारताचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी इंग्लंडच्या टीमवर निशाणा साधला. याचसोबत त्यांनी सीरिजच्या निकालावरही भविष्यवाणी केली. सोनी स्पोर्ट्सवर बोलताना गावसकर म्हणाले, ‘इंग्लंड फक्त दोन खेळाडूंची टीम आहे. टीममध्ये फक्त जो रूट (Joe Root) आणि जेम्स अंडरसनच (James Anderson) आहेत. बाकीचे टेस्ट क्रिकेटचे खेळाडूही वाटत नाहीत. इंग्लंडच्या बॅट्समनचं तंत्र समजण्यापलीकडचं आहे. ओपनरची कामगिरी खराब होत आहे. हसीब हमीद (Haseeb Hameed) घाबरलेला वाटतो. जो रूट उत्कृष्ट आहे. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) कधी चालतो, कधी नाही. बटलर (Jos Butller)पांढऱ्या बॉलसाठी चांगला खेळाडू आहे, पण तो लाल बॉलच्या क्रिकेटसाठी फिट वाटत नाही,’ असं मत गावसकरांनी मांडलं.
इंग्लंडचे ओपनर रॉरी बर्न्स (Rory Burns) आणि डॉम सिबली (Dominic Sibley) यांना दुसऱ्या इनिंगमध्ये एकही रन करता आली नाही. त्याआधी मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी 9 व्या विकेटसाठी 89 रनची नाबाद पार्टनरशीप केली, त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाचं पुनरागमन झालं. गावसकरांनी या कामगिरीनंतर इंग्लंडच्या बॉलर्सवरही टीका केली.
‘बॉलिंगमध्ये फक्त जेम्स अंडरसन होता, बाकी कोणी नाही. नॉटिंघममध्ये ओली रॉबिनसनला (Ollie Robinson) 5 विकेट मिळाल्या, पण तो टीमसाठी पूर्णपणे फिट वाटला नाही. त्यामुळे भारत सीरिजमधल्या उरलेल्या तीनही मॅच जिंकेल, असं मला वाटतं,’ अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.
सीरिज सुरू व्हायच्या आधीच भारत 4-0 किंवा 3-1 ने जिंकेल असं मी म्हणालो होतो. पावसाने खेळ खराब केला नसता तर टीम इंडियाचा 4-0 ने विजय झाला असता, असं वक्तव्य गावसकरांनी केलं. पहिल्या टेस्टच्या अखेरच्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना ड्रॉ झाला. या सामन्यात शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 157 रनची गरज होती.

Published by:Shreyas

First published:

india vs englandsunil gavaskarअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #गवसकरन #इगलडच #इजजतच #कढल #लरडस #टसटनतर #डवचल

RELATED ARTICLES

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

Most Popular

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....