Saturday, November 27, 2021
Home क्रीडा IND vs ENG : इंग्लंडची टीम डरपोक, सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह!

IND vs ENG : इंग्लंडची टीम डरपोक, सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राईव्ह!


सचिनचा इंग्लंडच्या रणनितीवर निशाणा

लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताकडून 151 रनने पराभव झाल्यानंतर इंग्लंडची टीम (India vs England Lords Test) आणि त्यांचा कर्णधार जो रूटवर (Joe Root) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) इंग्लंडची रणनिती आणि त्यांच्या बॅटिंगवर टीका केली आहे.

लंडन, 17 ऑगस्ट : लॉर्ड्स टेस्टमध्ये भारताकडून 151 रनने पराभव झाल्यानंतर इंग्लंडची टीम (India vs England Lords Test) आणि त्यांचा कर्णधार जो रूटवर (Joe Root) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महान बॅट्समन सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) इंग्लंडची रणनिती आणि त्यांच्या बॅटिंगवर टीका केली आहे. भारतीय बॉलर्सचं आक्रमण पाहून इंग्लंडचे खेळाडू घाबरले आहेत. भारताच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे खेळाडू हैराण दिसत आहेत. फक्त जो रूटच शतक करण्यासाठी सक्षम वाटत आहेत, असंही सचिन म्हणाला.
‘जो रूटने जेव्हा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला तेव्हा मी हैराण झालो. इंग्लंडची टीम भारताच्या फास्ट बॉलिंग आक्रमणाला घाबरली आहे, हेदेखील यावरून दिसून आलं. हवामानाने साथ दिली तर भारत ही टेस्ट मॅच जिंकेल, हे मी माझ्या मित्राला शुक्रवारी सकाळी 8 वाजता सांगितलं. भारताच्या ओपनरनाही याचं श्रेय मिळालं पाहिजे. पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली,’ असं सचिन पीटीआयशी बोलताना म्हणाला.
‘जो रूट वगळता कोणताही इंग्लंडचा खेळाडू नियमीत पणे शतकीय खेळी करताना दिसत नाही. एखाद्या मॅचमध्ये ते मोठा स्कोअर करतील, पण नेहमी असं होत नाही. आधी इंग्लंडच्या टीममध्ये एलिस्टर कूक, मायकल वॉन, केव्हिन पीटरसन, इयन बेल, जोनथन ट्रॉट, एन्ड्रयू स्ट्राऊस यांच्यासारखे खेळाडू होते. जे नियमीतपणे चांगले खेळायचे. कमजोर बॅटिंगमुळे रूटने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला असेल,’ अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.
पहिल्या इनिंगमध्ये शतक करणारा रूट दुसऱ्या इनिंगमध्ये लवकर आऊट झाला, यानंतर इंग्लंडची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा फक्त 120 रनवर ऑल आऊट झाला.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #इगलडच #टम #डरपक #सचन #तडलकरच #सटरट #डरईवह

RELATED ARTICLES

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

Parambir Singh : परमबीर सिंहांची आता सीआयडी चौकशी! मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा

Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी...

विकी आणि कतरिनाच्या लग्नाबद्दल विकीच्या बहिणीने दिली माहिती; म्हणाली…

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding :  अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हे...

Most Popular

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

विल्यमसन की राशिद?; रिटेंशन प्रक्रियेत अडचणीत सापडली सनरायझर्स!

लेगस्पिनर राशिद खानला रिटेन ठेवण्यासाठी सनरायझर्स हैदराबादला अडचणी येत आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

सॅमसंगच्या या स्मार्टफोनला खरेदी करा २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत, पाहा जबरदस्त ऑफर

हायलाइट्स:स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करा सॅमसंगपासून आयफोन पर्यंत समावेश हा सेल २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरूनवी दिल्लीः ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) देशातील प्रमुख...

वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

राजस्थान, 27 नोव्हेंबर: राजस्थानची (Rajasthan)राजधानी जयपूर (Jaipur) ग्रामीणमधील पावटा भागात गुरुवारी रात्री उशिरा गोंधळ झाला. दलित व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...