Saturday, July 2, 2022
Home क्रीडा IND v ENG : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठे धक्के, दोन...

IND v ENG : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडच्या संघाला मोठे धक्के, दोन मॅचविनर खेळाडू संघाबाहेर


लंडन : दुसरा कसोटी सामना सुरु व्हायला काही तासांचा अवधी असताना आता इंग्लंडच्या संघाला एकामागून एक असे दोन मोठे धक्के बसले आहेत. इंग्लंडला सामना जिंकवून देण्यात मोलाची जबाबदारी उचलणारे दोन खेळाडू आता संघाबाहेर जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

इंग्लंडचे कोणते दोन महत्वाचे खेळाडू संघाबाहेर जाणार, पाहा…
इंग्लंडची गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. इंग्लंडच्या गोलंदाजीचे सारथ्य करतो तो स्टुअर्ट ब्रॉड. पण आता ब्रॉडला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे तो आता दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सराव करत असताना ब्रॉडच्या पायांच्या पोटऱ्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे उद्या त्याला हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेण्यात येणार आहे. त्यामुळे आता १५०वा कसोटी सामना ब्रॉडला उद्या खेळता येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्याजागी संघात आता सकिब महमुद या वेगवान गोलंदाजाला स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या गोलंदाजीचा हुकमी एक्का असणारा जेम्स अँडरसनही उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण अँडरसन हा पूर्णपणे फिट नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता ५० टक्के आहे. जर उद्याच्या सामन्यात ब्रॉड आणि अँडरसन हे दोघे खेळले नाहीत, तर हा इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का असेल. आतापर्यंत २०१६नंतर हे दोघेही इंग्लंडच्या संघाबाहेर गेले नव्हते. त्यामुळे पाच वर्षांनंतर हे दोघही खेळाडू एकाच वेळेला संघाबाहेर असल्याचे पाहायला मिळू शकते.

ब्रॉडला उद्या वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. त्यांनतर त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो किती दिवस क्रिकेटपासून लांब राहणार, हे समजू शकते. ब्रॉड आपला १५० वा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानात खेळण्यासाठी सज्ज झाला होता. पण सराव करताना त्याच्या पोटऱ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे उद्याचा सामना तर तो खेळू शकणार नाही. पण त्याला किती दिवस विश्रांती घ्यावी लागेल, हे सर्वांना उद्याच समजू शकणार आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#IND #ENG #दसऱय #कसट #समनयपरव #इगलडचय #सघल #मठ #धकक #दन #मचवनर #खळड #सघबहर

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

मेटाचा महत्वपूर्ण निर्णय, इंजिनियरच्या भरतीत होणार मोठी कपात, आर्थिक मंदीचा फटका

META : सोशल मीडिया साईट फेसबुकची मूळ कंपनी मेटानं (Meta) यावर्षी  10 हजार नवीन इंजिनियरची भरती करणार असल्याचे...

Ketaki Chital:माझ्यावर हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते-केतकी चितळे

मुंबई, 01 जुलै: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ( Ketaki Chitale) अटक करण्यात...

गर्भपात क्लिनिकला भेट देणाऱ्या व्यक्तीची ‘लोकेशन हिस्ट्री’ गुगल हटवणार!

Right To Abortion : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (US Supreme Court) गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय...

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...