Saturday, July 2, 2022
Home क्रीडा ICC T20 World Cup 2021: अखेर संपणार क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा, या दिवशी...

ICC T20 World Cup 2021: अखेर संपणार क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा, या दिवशी पाकिस्तानविरुद्ध भिडणार भारत


नवी दिल्ली, 04 ऑगस्ट: क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. भारतीय आणि पाकिस्तानातील क्रिकेट चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. दीर्घ कालावधीनंतर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेला (ICC T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही लीग सुरू झाल्यानंतर काही काहीच दिवसात भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) एकमेकांसमोर भिडणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी दुबईत हा सामना रंगणार आहे. विविध कारणांमुळे भारत-पाकिस्तानमध्ये बऱ्याच काळापासून द्विपक्षीय सामने खेळवले गेले नाही आहेत. पण आता टी20 वर्ल्डकपमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याकडे भारत-पाकिस्तानमधील चाहत्यांसह संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.
हे वाचा-आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल,रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये
ही स्पर्धा यावर्षी भारतात होणार होती, मात्र भारतातील कोरोनाच्या परिस्थितीमुळे टी20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान (UAE and Oman) मध्ये होणार आहे. या लीगमधील सामने दुबई, अबूधाबी, शारजाह आणि ओमानमध्ये होणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे सामने खेळवले जाणार आहेत.
भारत आणि पाकिस्तानहे पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एका वर्ल्ड कपमध्ये आमने-सामने असणार आहेत. आयसीसीने केलेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) ग्रुपच्या घोषणेनुसार, दुसऱ्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे.
हे वाचा-Lovlina Borgohainचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, कांस्यपदकावर मानावं लागणार समाधान
टी-20 वर्ल्ड कपला सुरू व्हायच्या आधी काही टीमना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. क्वालिफायर राऊंडमध्ये ग्रुप-ए आणि ग्रुप-बी अशी विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप-एमध्ये श्रीलंका, आयर्लंड, नेदरलंड्स आणि नामिबिया यांचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी आणि ओमान या टीम आहेत. या दोन्ही ग्रुपमधल्या प्रत्येकी दोन-दोन टीम वर्ल्ड कपला क्वालिफाय होतील.
ग्रुप -1 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज यांच्यासह ग्रुप-एचा विजेता आणि ग्रुप-बीचा उपविजेता संघ असेल.
ग्रुप-2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, ग्रुप एचा उपविजेता आणि ग्रुप बीचा विजेता असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ICC #T20 #World #Cup #अखर #सपणर #करकट #चहतयच #परतकष #य #दवश #पकसतनवरदध #भडणर #भरत

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Mangesh Desai : मंगेश देसाईने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या खास शुभेच्छा

Mangesh Desai : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच...

Uric Acid पासून त्रस्त आहात? मग ‘हा’ रामबाण उपाय एकदा करुन पाहा, फरक नक्की जाणवेल

यूरिक ऍसिड ही एक अशी एक समस्या आहे, जी खराब जीवनशैली आणि अनियमित आहारामुळे वाढू लागते.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

मुंबई, 30 जून : शिवसेनेचे बंडखोरे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज अखेर भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं. त्यांनी आज संध्याकाळी...

Marathwada: मराठवाड्यात आतापर्यंत 137 मिलिमीटर पाऊस; गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच

Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी...

शिंदे सरकारचं भवितव्य रविवारी होणार निश्चित, Floor Test पूर्वीच निर्णायक परीक्षा

मुंबई, 1 जुलै : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार स्थापन झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि...