Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा


How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्री श्रृती हसनने इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत PCOS बाबत सांगितले आहे. तिनं म्हटलं आहे की, ती मागील काही काळापासन हार्मोनल आजाराचा सामना करत आहे. श्रुतीनं पुढे सांगितलं आहे की, योग्य आहार, व्यायाम आणि चांगली झोप याच्या आधारे तुम्ही या आजारापासून सुटका मिळवू शकता.

PCOS पासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.

PCOS म्हणजे काय?
पॉलीसिस्टिक ओव्हेरीज सिंड्रोम (PCOS) हा स्त्रियांमधील जीवनशैलीशी संबंधित सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. या आजारात हार्मोनल असंतुलन होते. त्यामुळे वजन वाढते, मासिक पाळी अनियमित होते, चेहऱ्यावर केसांची वाढ होऊ लागते. या रोगात, अंडाशयात लहान गाठी तयार होतात. यामुळे मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो आणि वंध्यत्व देखील होऊ शकते. या आजारात लठ्ठपणा आणि मधुमेह वाढण्याचीही शक्यता असते.

PCOS पासून कशी सुटका मिळवाल?
PCOS आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही परंतु योग्य काळजी घेतल्यास यावर नियंत्रण मिळवता येते. यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि औषधं घेणे अतिशय महत्वाचं आहे. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी तंदुरुस्त राहणं सर्वात आवश्यक आहे. वजन कमी झाल्यामुळे PCOS कमी होण्यास सुरुवात होते आणि जास्त वजनामुळे PCOS वाढते. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात ठेवणं गरजेच आहे.

कोणता व्यायाम करायचा?
1. PCOS नियंत्रणात ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणं. दररोज किमान 30-40 मिनिटे चालल्यानं वजन नियंत्रणात राहते.
2. दुसरा मार्ग म्हणजे एरोबिक, कार्डिओ किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम ज्यामध्ये वजन कमी होते. तुम्ही नाचणे किंवा पोहणे याचाही समावेश करु शकता. कमी वजनामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि PCOS मुळे उद्भवणारे इतर आजार होण्याची शक्यता कमी होते आणि मासिक पाळी देखील नियमित होऊ शकते.
3. तिसरा सर्वोत्तम मार्ग म्हणजे योग, कपालभाती प्राणायाम हा PCOS कमी करण्यासाठी सर्वोत्तम योग आहे. दिवसातून किमान 10 मिनिटे कपालभाती करून PCOS नियंत्रणात ठेवता येतो. याशिवाय अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम देखील हार्मोनल असंतुलन सुधारण्यासाठी मदत करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Control #PCOS #PCOS #चय #समसयपसन #सटक #मळव

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...