केमिकलयुक्त फेस वॉशचा नियमित वापर केल्यामुळे चेहऱ्याचे देखील नुकसान होऊ शकते. त्वचा कोरडी देखील होते. याला पर्याय म्हणून तुम्ही हर्बल फेस वॉशचा देखील वापर करू शकता. हर्बल फेस वॉशच्या वापरामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा निघून जातो. तसेच चेहऱ्यावरील दुर्गंध देखील साफ होते. तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेस वॉश तयार करू शकता. घरगुती पद्धतीने फेस वॉश कसा तयार करायचा हे आपण जाणून घेऊया.
Homemade Face Wash
बेसन पिठाने चेहरा स्वच्छ धूवा

– बेसन पिठापासून घरच्या घरी तुम्ही फेस पॅक देखील बनवू शकता. यामुळे चेहऱ्याला भरपूर लाभ देखील मिळतात. चेहरा धूण्यापूर्वी क्लिंजिंग मिल्कच्या सहाय्याने मेकअप पूर्णपणे साफ करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा.
– त्यानंतर एक चमचा बेसन पीठ हातात घ्या. हे पीठ ओल्या चेहऱ्यावरच लावा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा. फक्त १ ते २ मिनिटे बेसन पिठाने चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा. यामुळे तुमची त्वचा अगदी मऊ आणि सुंदर होईल. त्याचबरोबरीने चेहऱ्यावरील दुर्गंध देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत मिळेल.
(Hair Fall Tips : ‘या’ आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर कराल तर केसगळतीपासून मिळेल सुटका, केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय)
केळ्यापासून तयार करा फेस वॉश

– केळ्याचा चेहऱ्यासाठी वापर केल्यास यामधून मिळणारे फायदे बहुतांश जणांना ठाऊक असतील. काही जणं तर केळ्यापासून तयार करण्यात आलेल्या फेस वॉशचा वापर चेहऱ्यासाठी करतात. तुम्ही देखील या फळापासून तयार करण्यात आलेल्या फेस वॉशचा चेहऱ्यासाठी वापर करणं योग्य ठरू शकेल. याचा योग्य उपयोग कसा करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
– अर्ध केळं घ्या. हे केळं स्मॅश करा आणि याची पेस्ट तयार करा. यामध्ये तुम्ही दोन थेंब लिंबाचा रस मिक्स करू शकता. हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावून १ ते २ मिनिटे चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा. यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि आकर्षक होईल.
(सुंदर दिसण्यासाठी रेखा यांनी आयुष्यभर खाल्ले ‘हे’ खाद्यपदार्थ, वयाची साठी ओलांडल्यानंतरही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य)
दही आणि मधापासून तयार करा फेस वॉश

– दही आणि मध एकत्र मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. यामुळे तुमची त्वचा खोलवर साफ होण्यास मदत मिळते. जर तुमची त्वचा कोरडी आणि ताणलेली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या फेस वॉशचा वापर करू शकता. पण या फेस वॉशचा योग्य पद्धतीने वापर करा.
– १ चमचा दही आणि १ चमचा मध घ्या. मध आणि दही चांगल्या पद्धतीने एकजीव करा. आणि त्यानंतर चेहऱ्यावर याचा वापर करा. त्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ धूवा. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहणार नाही. त्याचबरोबरीने चेहरा देखील काळवंडलेला राहणार नाही.
(Skin Care Pimple Removal : ‘या’ सोप्या उपायांमुळे एका रात्रीत मुरुमांपासून मिळेल सुटका, चेहऱ्यावरील डागही कायमचे होतील दूर)
दही आणि कोरफड

फार पूर्वीपासून चेहऱ्यासाठी कोरफडचा वापर करण्यात येतो. तुम्ही घरच्या घरी हळद पावडर, कोरफड जेल आणि दही पासून मिश्रण तयार करू शकता. तसेच याचा तुम्ही चेहऱ्यासाठी वापर करू शकता. एका वाटीमध्ये १ ते २ चमचे ताजं दही घ्या. यामध्ये चिमुटभर हळद आणि कोरफड जेल मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण एकजीव करून घ्या. याचा चेहऱ्यासाठी वापर केल्याने बाहेरील प्रदुषाणापासून त्वचा सुरक्षित राहते. तसेच कोणत्याच प्रकारच्या एलर्जीमुळे त्वचेचे नुकसान होत नाही.
(Skin Care Tips : गुळाचा असा वापर कराल तर दिवसेंदिवस दिसू लागाल तरुण, सुरकुत्या, मुरुमांसाठी उत्तम उपाय)
काकडीचा वापर

काकडीचं सेवन केल्यामुळे शरीराला तसेच त्वचेला देखील भरपूर लाभ मिळतात. पण त्याचबरोबरीने काकडीचा चेहऱ्यासाठी वापर केल्यास यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होण्यास मदत मिळू शकते. काकडीचे दोन तुकडे घ्या. काकडीचे हे तुकडे किसून घ्या. किसलेल्या काकडीचा रस काढा. काकडीच्या या रसमध्ये गुलाबपाणी मिक्स करा. आणि हे पाणी चेहऱ्याला लावा. तुम्ही मानेला देखील हे पाणी लावू शकता. यामुळे तुमचा चेहरा अगदी फ्रेश दिसू लागेल.
(Hair Care Tips : ५ मिनिटांमध्ये तयार करा घरगुती तेल, अशा पद्धतीने वापर केल्यास आठवड्याभरातच केस होतील लांबसडक, घनदाट)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#Herbal #Face #Wash #महनत #न #करतच #तवचचय #समसय #हतल #दर #दवसतन #फकत #५ #मनट #कर #ह #कम