Thursday, July 7, 2022
Home भारत Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या


पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने वादळ आलं आणि त्यानंतर काही वेळाने हलका आणि जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यादरम्यान राज्यात विविध घटनांमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये मुझफ्फरपूरमधील पाच, भागलपूरमधील चार, लखीसराय-सारणमधील प्रत्येकी तीन, मुंगेरमधील दोन आणि जमुई, बांका, बेगुसराय, खगडिया, पूर्णिया, नालंदा, जेहानाबाद आणि अररिया येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यावेळी अनेक ठिकाणी कच्चा घरे आणि झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतुकीसह वीजपुरवठ्यावर परिणाम झाला.

निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला, 6-7 लोक ढिगाऱ्याखाली अडकले

वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी पाटण्यातील मणेर येथे वाळू वाहून नेणाऱ्या सहा बोटी गंगेत बुडाल्या. सुमारे 50 मजुरांनी पोहून त्यांचे प्राण वाचवले.

मान्सूनपूर्व उपक्रम आता सक्रिय

हवामानशास्त्रज्ञ आशिष कुमार यांच्या मते, वातावरणातील आर्द्रता-समृद्ध हवेचा प्रवाह, तापमानात झालेली वाढ आणि मध्य बिहारमधून ट्रफ लाइन गेल्यामुळे वादळ आणि पाऊस झाला आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व हालचाली सक्रिय झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पूर्वेकडील प्रवाहामुळे वातावरणातील खालच्या पातळीवर आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली होती.

अनेक जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज

त्याचवेळी बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल झाला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पश्चिम ट्रफ मध्य बिहारमधून उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशातून उप हिमालयीन पश्चिम बंगालकडे जात आहे. या प्रभावामुळे राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे. या सर्व हवामानाचा परिणाम लक्षात घेता, पाटणा हवामान केंद्राने यलो अलर्ट जारी करताना लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Heavy #Rain #वदळ #पवसच #कहर #जणच #मतय #सह #बट #बडलय

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

अरेच्चा! लाँचआधीच iPhone 14 ची प्री-बुकिंग सुरू, किंमत वाचून बसेल धक्का; पाहा काय आहे खास

नवी दिल्ली : Upcoming Apple iPhone 14 : गेल्या अनेक दिवसांपासून अपकमिंग Apple iPhone 14 सीरिजची चर्चा सुरू आहे. कंपनी आयफोन १४ ला...

Healthy Poha : ब्रेकफास्टमध्ये पोहे खाताय; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे!

Healthy Poha : ब्रेकफास्टमध्ये पोहे खाताय? जाणून घ्या, आरोग्यदायी फायदे! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

हॉटेलमध्ये सुरक्षित मुक्कामासाठी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या टिप्स

मुंबई 05 जुलै : अनेकदा कुठेतरी फिरायला किंवा कामानिमित्त बाहेर गेलेलो असतो तेव्हा आपल्यावर हॉटेलमध्ये थांबण्याची वेळ येते. अशावेळी अनेकांच्या मनात हॉटेलच्या सुरक्षेबाबत...

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा, उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदी वर्णी लागणार

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नकवी यांच्या राज्यसभेच्या...

नेहा धुपियाच्या डोक्यावर ‘मिस इंडिया’चा ताज; मुलं झाल्यानंतरही स्वतःला असं ठेवते फोकस

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने २००२ साली 'फेमिना मिस इंडिया' हा किताब जिंकला. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या २० वर्षांत नेहाने आपलं वेगळं...

पत्नी Sex ला नकार देत असेल तर…; अशावेळी काय विचार करतात पुरुष? NFHS मध्ये खुलासा

या सर्वेक्षणामध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...