Thursday, July 7, 2022
Home लाईफस्टाईल Health Tips : जास्त प्रमाणात पिस्ता खाणे ठरू शकते धोकादायक, होतात गंभीर...

Health Tips : जास्त प्रमाणात पिस्ता खाणे ठरू शकते धोकादायक, होतात गंभीर दुष्परिण


मुंबई, 24 जून : आपल्याकडे काजू, बदाम, मनुके, पिस्ता असा सुका मेवा (Dry fruits) खायला कुणाला नाही आवडतं ? त्यातल्या त्यात पिस्ता तर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा असतो. अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पिस्त्यामध्ये हाय प्रोटीन, हेल्दी फॅट्स, अँटी-ऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 असते. पिस्ता पौष्टिक जरी असला तरी याच्या अतिसेवनाने अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात (Side Effects Of Pistachio).

आज आम्ही तुम्हाला पिस्त्याचे अतिसेवन केल्यास तुम्हाला कोणत्या गंभीर समस्या होऊ शकतात याबद्दल माहिती देणार आहोत. पिस्ता इतर सुक्या मेव्याप्रमानेच आपण कधीही आणि कितीही प्रमाणात खाऊ शकतो. मात्र पिस्त्याचे दररोज सेवन केल्यास तुमचे वजन वाढवण्याची शक्यता असते (Weight Gain). त्यामुळे जास्त वजन असणाऱ्या लोकांनी पिस्त्याचे सेवन अगदी माफक प्रमाणात करावे.

Garlic Benefits : रात्री झोपताना उशीखाली जरूर ठेवा लसूण; बहुगुणी लसणाचा हा फायदा तुम्हाला माहिती नसेल

भाजलेल्या पिस्त्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते आणि मिठाच्या म्हणजेच सोडियमच्या अतिसेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो. पिस्त्याच्या अतिसेवनामुळे हाय ब्लडप्रेशर (High Blood Pressure) होण्याचीदेखील शक्यता असते. पिस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असते. हे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. परंतु जास्त फायबरदेखील आपल्यास शरीरासाठी चांगले नसते. त्यामुळे अतिसार, पोटदुखी आणि पोटात वेदना होऊ शकतात.

Beauti Tips: पंचवीशीतील पोरासारखं तरूण दिसायचंय? फॉलो करा या 5 टिप्स

पिस्त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि जास्त प्रमाणात पोटॅशियम शरीरात गेल्यास आपल्याला किडनीचे आजार उद्भवू शकतात. पिस्त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास मळमळ, अशक्तपणा आणि अनियमित हृदयाचे ठोके असा त्रासदेखील होऊ शकतो. त्यामुळे पिस्त्याचे सेवन प्रमाणात करण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by:Pooja Jagtap

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Health #Tips #जसत #परमणत #पसत #खण #ठर #शकत #धकदयक #हतत #गभर #दषपरण

RELATED ARTICLES

Kolhapur News : कोल्हापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी 13 जुलैला आरक्षण जाहीर होणार

Kolhapur ZP and Panchayat Samiti Election 2022 : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 13 जुलैला आरक्षण...

भयंकर! घटस्फोट मागितला म्हणून पत्नीला भररस्त्यात जाळलं, CCTV मध्ये घटना कैद

मुंबई, 7 जुलै : पत्नी-पत्नीच्या (Husband-Wife) नात्याला काळिमा फासणारी एक भयंकर घटना घडली आहे. एका पतीनं भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं....

Male Fertility : दररोज Sex करत असाल तर सावधान…कारण…

कस्तुरबा मेडिकल कॉलेज, MAHE-मणिपाल आणि युनिव्हर्सिटी ऑफ म्युन्स्टर, जर्मनीच्या संशोधकांनी Ejaculationची लांबी आणि त्याचा स्पर्म्सवर होणारा परिणाम यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अस्वीकरण:...

Most Popular

सोनेरी साडी, शाही दागिने ऐश्वर्या रायच्या लूक पुढे ‘अप्सरा’ ही फिक्या, सोशल मीडियावर नुसती आग

Ponniyin Selvan Aishwarya Rai Bachchan Look: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'पोन्नियन सेल्वन' या सिनेमातील नविन लूक नुकताच सर्वांसमोर आला आहे. या चित्रपटात ऐश्वर्या...

दैनंदिन राशीभविष्य: काय राशी..काय ग्रह..काय भविष्य? ओक्केमध्ये जाईल आजचा दिवस?

आज दिनांक ७ जुलै २०२२ गुरूवार . तिथी आषाढ शुक्ल अष्टमी. आज दिवस शुभ आहे. आज चंद्र कन्या राशीतून भ्रमण करेल.. पाहुया आजचे...

Mumbai : पोलीस दलातील बहुतांश पोलीस अधिकारी संजय पांडे निवृत्त होण्याची वाट पाहत होते? वाचा..

Mumbai Police : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची आता ईडी चौकशी सुरू झाली आहे. मंगळवारी ते...

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

MS Dhoni Birthday: फक्त धोनीच करू शकतो; ‘हे’ ५ विक्रम मोडणे अवघड नाही तर अशक्यच!

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आज त्याचा ४१वा वाढदिवस (MS Dhoni Birthday) साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये धोनीने अशी कामगिरी...

सासरी सापडला कुस्तीपटूचा मृतदेह; मृत्यूच्याआधी फेसबुक लाइव्हमध्ये केला गंभीर आरोप

नवी दिल्ली: दिल्लीच्या उत्तम नगर परिसरात बुधवारी CWE रेसरल शुभम उर्फ राव पृथ्वी सिंह याचा संशयास्पदरित्या मृत्यू झालाय. शुभमने द ग्रेट खलीकडून प्रशिक्षण...