Saturday, July 2, 2022
Home करमणूक HBD: 'लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही' तापसीने घेतला हा निर्णय,...

HBD: ‘लिहून देते, कोणत्याही अभिनेत्याला डेट करणार नाही’ तापसीने घेतला हा निर्णय, पाहा काय होतं कारण


मुंबई 1 ऑगस्ट : आपली स्पष्ट मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. आजवर चित्रपटांत अनेक दमदार भूमिका तिने साकारल्या आहेत. मॉडेलिंग पासून आपंल करिअर सुरू कऱणारी तापसी आज साउथ ते बॉलिवूड एक प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. 1 ऑगस्ट 1987 ला तापसीचा दिल्लीत जन्म झाला होता. तिचे वडील हे रियल इस्टेट एजंट होते. तर आई गृहीनी आहे.

तापसीने दिल्लीतच तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ती कम्प्युटर इंजिनीयरिंगची विद्यार्थीनी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तापसीने काही दिवस कामही केलं. पण तिला मॉडेलिंगमध्ये रस होता. तेव्हा तिने काही सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेतला होता. फेमिना मिस इंडियाची ती बेस्ट स्किन या टायटलची मानकरी ठरली होती. यानंतर तिने अभिनयाकडे वाटचाल सुरू केली होती. नुकताच तिचा हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

तापसी तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा ती तिची ठाम मतं मांडते. मग ती फिल्मी असो किंवा राजकीय. तापसीने तिच्या रिलेशनशिप विषयी देखील एका मुलाखतीत ठाम मत मांडलं होतं. 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत लाइफ पार्टनर विषयी बोलताना तापसी म्हणाली होती,” मी कधीच कोणत्या स्टारला डेट केलं नाही. आणि कधीच कोणाला करणारही नाही, आणि हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकते.” असं तापसी म्हणाली होती.

याचं कारणही तिने पुढे सांगितलं होतं, ती म्हणाली होती, “कारण या बाबतीत मी अतिशय स्पष्ट आहे की, माझ्याशिवाय रिलेशनशिपमध्ये कोणीही स्टार नसेल. मला स्वतःला असं वाटंत की एक अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात काही होऊ शकेन.” एका अभिनेत्याला डेट किंवा लग्न करण्याचं हे कारण तापसीने सांगितलं होतं.

छोटा पांड्या झाला एक वर्षांचा; नताशाने असा केला मुलाचा वाढदिवस साजरा

सध्या तापसी एका बॅडमिंटन प्लेयरला डेट करत आहे. मॅथियस बो असं त्याचं नाव आहे. डेन्मार्कचा रहिवाशी असणारा मॅथियस आणि तापसी अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तापसीने आपल्या अभिनयाने लाखो चाहते निर्माण केले आहेत. पिंक, मुलुख, मिशन मंगळ ते आता हसीन दिलरुबा अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. सोशल मीडियावरही तिची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#HBD #लहन #दत #कणतयह #अभनतयल #डट #करणर #नह #तपसन #घतल #ह #नरणय #पह #कय #हत #करण

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉयचा पराभव

पीटीआय, क्वालालम्पूर : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगकडून तीन...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

10 तासांनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई, 1 जुलै : शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांची आज तब्बल 10 तास ईडीच्या (Sanjay Raut to Appear Before ED) कार्यालयात चौकशी...

वारंवार Sex करण्याची सवय असणं म्हणजे आजार आहे का?

वारंवार लैंगिक संबंध ठेवण्याच्या व्यसनाला आजार म्हटलं जाऊ शकतं का? अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

VIDEO : कावळा उड्-चिमणी उड्… क्रिकेट सोडून Team India च्या खेळाडूंचा सुरुये भलताच गेम

मुंबई : टीम इंडियाने आयर्लंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकली. भारताने दोन टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. सध्या, भारताचा प्रदीर्घ फॉरमॅट स्पेशालिस्ट टीम बर्मिंगहॅममध्ये इंग्लंड...