Monday, July 4, 2022
Home करमणूक HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास

HBD: अभिनयानंतर यशस्वी उद्योजकही आहे सुनील शेट्टी; पाहा अभिनेत्याचा प्रवास


मुंबई 11 ऑगस्ट : बॉलिवूडचा अँक्शन हिरो अशी अभिनेता सुनील शेट्टींची (Suneil Shetty) ओळख आहे. अनेक हिट चित्रपट दिलेल्या सुनील शेट्टींना आजही लोक त्यांच्या प्रत्येक चित्रपटासाठी ओळखतात. एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. आज सुनील यांचा वाढदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या त्यांच्याविषयी खास गोष्टी.

सुनील शेट्टींचा जन्म 11 ऑगस्ट 1961 साली मंगरुळूत झाला होता. अभिनयात रुची नसलेल्या सुनील यांनी नंतर याच क्षेत्रात मोठं नाव कमावलं. त्यांनी काही मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना अभिनय नाही क्रिकेट खेळायचं होतं पण चित्रपटांतच जास्त यश मिळू लागलं. 1992 साली आलेला चित्रपट ‘बलवान’मधून (Balwan) त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली होती.

त्यानंतर सुनील यांनी ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘टक्कर’, ‘कृष्णा’, ‘सपूत’, ‘बॉर्डर’, ‘भाई’, ‘आक्रोश’ अशा सुपरहिट चित्रपटांत काम केलं. केवळ अँक्शन चित्रपटच नाही तर कॉमेडी, रोमॅन्टीक आणि विलन अशा चित्रपटांतही कामं केली आहेत. ज्यात हेराफेरी, धडकन या चित्रपटांचा समावेश होतो. ‘रुद्राक्ष’ , ‘मैं हूं न’ या चित्रपटांत त्यांनी खलनायकाची भूमिके देखील साकारली आहे.

हे बॉलिवूड सेलिब्रिटी होते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये; Breakup करत केलं दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न

एक अभिनेता म्हणूनच नाही तर तर एक उत्तम उद्योजक म्हणूनही सुनील यांची ओळख आहे. चित्रपटांपेक्षाही अधिक पैसे ते आपल्या बिझनेसमधून कमावतात. सुनील शेट्टींची अनेक रेस्टॉरंट्स (Restaurants) आणि क्लब्स (Clubs) आहेत. याशिवाय एका अँडव्हेंचर पार्कचे (Adventure park) ते मालकही आहेत. फक्त रेस्टॉरंट्सच नाही तर फर्निचर, होम डेकॉर या क्षेत्रातही त्यांचा मोठा व्यवसाय आहे. याशिवाय रियल इस्टेटमध्येही त्यांचा बिझनेस आहे. त्यात ते सर्वाधिक पैसे कमावतात असं सांगण्यात येतं. त्यामुळे सध्या त्यांनी पूर्ण लक्ष हे आपल्या बिझनेसवर दिलं आहे. काही काळ ते चित्रपट निर्मातेही होते, पण त्यात त्यांना फार यश मिळालं नव्हतं.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#HBD #अभनयनतर #यशसव #उदयजकह #आह #सनल #शटट #पह #अभनतयच #परवस

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...