Monday, July 4, 2022
Home करमणूक hardik joshi and akshaya deodhar wedding venue know the details | राणादा-...

hardik joshi and akshaya deodhar wedding venue know the details | राणादा- पाठकबाईंची लगीनघाई, ‘या’ ठिकाणी अक्षया- हार्दिक घेणार सप्तपदी!‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचा साखरपुडा अलिकडेच पार पडला. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण मालिकेत एकत्र काम करत असतानाही या दोघांच्या नात्याबद्दल कोणाला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांचा साखरपुडा सर्वांसाठी सुखद धक्काच होता. आता या दोघांच्या लग्नाबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. हे दोघं लग्न कधी करणार आणि कुठे करणार याची सोशल मीडियावर चर्चा सुरू असताना नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिकनं याचं उत्तर दिलं आहे.

अक्षया आणि हार्दिक लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून दोघांच्या घरी लग्नाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. पण अलिकडेच या जोडीने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी या मंचावर त्यांनी धम्माल गप्पा मारल्या आणि लग्नाच्या प्लानबद्दलही बरेच खुलासे केले. या शोमध्ये या दोघांना ‘लग्न कुठे करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला, “आम्ही लग्न पुण्यात करणार आहेत. वेन्यू अजून नक्की केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच आम्ही, विराजस आणि शिवानीनं ज्या ठिकाणी लग्न केलं ती जागा पाहून आलो आहोत. तिथेच लग्न करण्याचा आमचाही विचार आहे.”

आपल्या साखरपुड्याबद्दल बोलाताना हार्दिक म्हणाला, “आमच्या साखरपुड्याचे आउटफिट्स हे कोल्हापूरवरून मागण्यात आले होते. कोल्हापूरशी आमचं खास नातं आहे. आम्ही दोघांनी ज्या मालिकेत एकत्र काम केलं त्याची कथा कोल्हापूरमधली होती. तिथेच आमच्या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती. त्यामुळे मालिकेच्या आठवणी जपण्यासाठी आम्ही कपडे कोल्हापूरवरूनच मागवणार असं ठरलं होतं.”

याशिवाय या शोमध्ये हार्दिकनं अक्षयाच्या स्वभावाविषयी देखील सांगितलं. “ती कोणत्या गोष्टीवर किती आणि काय प्रतिक्रिया देणार याचा मला अंदाज असतो. एकंदर वाघ कधी डरकाळी फोडणार हे माहीत असतं.” असंही तो मिश्किलपणे म्हणाला. तर ‘अक्षयाबद्दल तुला कोणती गोष्ट आवडत नाही?’ या प्रश्नावर तो म्हणाला, “ती पटकन रागावते आणि त्यानंतर ती काही बोलते, काहीही करू शकते. मला वाटतं लग्नानंतर तिने ही गोष्ट बदलायला हवी.” दरम्यान अक्षया आणि हार्दिक यांनी ३ मे रोजी ठाण्यात साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#hardik #joshi #akshaya #deodhar #wedding #venue #details #रणद #पठकबईच #लगनघई #य #ठकण #अकषय #हरदक #घणर #सपतपद

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Most Popular

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...