Thursday, July 7, 2022
Home टेक-गॅजेट Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय...

Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहित करुन घ्यायची असते तेव्हा शक्यतो Google चा आधार घेतला जातो. गुगल सर्च (Google Search) करुन विविध माहिती मिळवली जाते. काही वेळा काही गोष्टी अनेक लोकांकडून सर्च केल्या जातात, ज्या की सर्चिंग लिस्टमध्ये सर्वात वर (Most Searched on Google) येतात.  ‘ईयर इन सर्च’ रिपोर्टनुसार कोरोना काळात जगरभरात कोरोना व्हायरस या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर होतं. अर्थात युजर्सनी सर्वाधिक वेळा कोरोना व्हायरसबाबत सर्च केलं होतं. मात्र एका शब्दाच्या सर्चमध्ये 5000% पेक्षा जास्त तेजी आढळून आली आहे. त्यामुळे हा शब्द तसा खासंच आहे, जाणून घ्या काय आहे हा शब्द आणि काय आहे त्याची विशेषता
देशभरात स्टॉक मार्केटबाबत सध्या औत्सुक्य वाढू लागलं आहे. लोकं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागल्यामुळे यासंदर्भातील विविध गोष्टींचा अभ्यास केला जातो. अनेक नवनवीन शब्दांचे अर्थ गुगलवर शोधले जातात. दरम्यान 2020 च्या लॉकडाऊनमध्ये Google वर ‘FAANG स्टॉक’ या शब्दात ब्रेकआउट पाहायला मिळाला.
हे वाचा-PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे?
Google च्या मते ब्रेकआउटचा अर्थ असा आहे की एखादा शब्द 5000 टक्क्यांपेक्षा अधिक वेळा सर्च केला जाणं. FAANG ची प्रसिद्धी इतकी वाढली की जगभरातील खासकरुन आशियातील लोक याबाबत अधिक माहिती करुन घेऊ इच्छित होते. FAANG अमेरिकेतील सर्वात मोठ्या लिस्टेड कंपन्यांनी मिळून बनलेले आहे आणि गुंतवणुकदारांमध्ये सर्वात प्रसिद्ध देखील आहे.
काय आहे FAANG?
अलीकडेच FAANG stocks विशेष प्रसिद्धी मिळवत आहे.  FAANG stocks चा वापर सर्वात मोठ्या पाच महत्त्वाच्या आणि टॉप कंपन्यांच्या शेअर्सना परिभाषित केला जातो.
F – Facebook (फेसबुक)
A – Amazon (अॅमेझॉन)
A – Apple (अॅप्पल)
N – Netflix (नेटफ्लिक्स)
G – Google (आता Alphabet Inc.च्या नावाने ओळखलं जातं)
हे वाचा-Gold price: 2 दिवसात 1700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, आज काय आहे सोन्याचा भाव?
FAANG शब्दाचा वापर पहिल्यांदा 2013 मध्ये मॅड मनी जिम क्रेमरनी CNBC वरील कार्यक्रमात केला होता. क्रेमरनी सुरुवातीला FANG शब्दाचा वापर केला होता. त्यानंतर Apple ची लोकप्रियता वाढल्यानंतर आणखी एक A यामध्ये जोडला गेला. त्यामुळे FANG चं FAANG झालं.
का सर्वाधिक सर्च झाला हा शब्द?
गेल्यावर्षी कोरोना काळात अनेक लोकं काम आणि मनोरंजन या गोष्टींसाठी सर्वाधिक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरच अवलंबून होते. या प्लॅटफॉर्म्सच्या लोकप्रियतेतंही वाढ झाली. Amazon Prime, Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मागणी वाढली. गुगल आणि फेसबुकवरही लोकं अधिक वेळ घालवत होते. यानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली.
या कंपन्यांची लोकप्रियता त्यावेळी पाहायला मिळाली जेव्हा अधिकतर भारतीय ब्रोकिंग फर्म्सनी परदेशीत व्यापारात अधिक सुविधा देण्यास सुरुवात केली. अर्थात ज्या भारतीय गुंतवणुकदारांचे प्रमुख ब्रोकिंग फर्मसह ट्रेडिंग खाते होते, ते अमेरिकन शेअर बाजारात लिस्टेड शेअर खरेदी करू शकत होते. ज्यात FAANG देखील समाविष्ट होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Google #वर #पकष #जसत #सरच #करणयत #ह #गषट #जणन #घय #कय #आह #ह #शबद

RELATED ARTICLES

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Indian Railways:PNRच्या 10 अंकांत काय दडलंय?प्रत्येक क्रमांकात असते विशेष माहिती

What is meaning of Indian Railway’s 10 digit PNR Number mhsa - Indian Railways: PNRमधील 10 अंकांत नेमकं काय दडलंय? प्रत्येक क्रमांकात असते...

Most Popular

Vasai Virar Rains Update : वसई-विरारमध्ये रात्रभर पाऊस, महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी

<p>सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळं साचून सुट्टी मिळेल का ? हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय.. आणि भोलानाथनं वसई-विरारच्या...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Live : पंतप्रधान मोदींनी स्वीकारला मुख्तार अब्बास नकवींचा मंत्रिपदाचा राजीनामा

शिवसेनेला झटका देणारी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे आता बंडखोर शिंदे गटाच्या मार्गावर आहेत. त्यांनी...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

Smartphone Offers: जुना स्मार्टफोन द्या आणि फक्त ४९९ रुपयांत घरी न्या Redmi चा 5G स्मार्टफोन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Redmi Note 10T 5G price: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वेळोवेळी अनेक आकर्षक ऑफर देत असते. ज्याचा फायदा घेऊन ग्राहक कमी किमतीत...

Marathi News : Marathi batmya, मराठी बातम्या, Latest News in Marathi, Live Breaking Marathi News | Lokmat News18

भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. आपल्याकडे तुळस असल्यास रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी अवश्य द्यावे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. अस्वीकरण: ही...