Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Google: आता 18 वर्षाच्या आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी...

Google: आता 18 वर्षाच्या आतील यूजर्स सर्च इंजिनवरुन आपला फोटो डिलीट करण्यासाठी विनंती करु शकणार


Google Images search : गुगलने आपल्या 18 वर्षांखालील यूजर्ससाठी इंटरनेट वापरताना अधिक सुरक्षितता मिळावी यासाठी आपल्या धोरणामध्ये बदल केला आहे. आपल्या 18 वर्षांखालील यूजर्सना त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित बनावे यासाठी त्यांच्या डिजिटल फुटप्रिंटवर अधिक नियंत्रण देण्याची घोषणा गुगलने केली आहे. गुगलच्या या नव्या धोरणानुसार आता 18 वर्षाच्या आतील यूजर्स हे गुगलला आपले फोटो हे सर्च इंजिनमधून हटवण्याची विनंती करु शकतात. 

जर यूजर्स हे अधिक लहान असतील किंवा त्यांना या प्रकारची विनंती करता येऊ शकली नाहीत तर त्यांचे पालक गुगलकडे तशा प्रकारची विनंती करु शकतात. पण सर्च इंजिनवरुन हे फोटो जरी हटवले तरी वेबसाईटवरुन ते हटवता येणार नसल्याचं गुगलने स्पष्ट केलं आहे. येत्या काही आठवड्यात आपण अशा प्रकारचे धोरण आणणार आहोत जे 18 वर्षाच्या आतील यूजर्सना किंवा त्यांच्या पालकांना गुगल रिझल्ट्सवरुन त्यांचे फोटो हटवण्यासाठी सक्षम करतील असं गुगलने म्हटलं आहे. 

सर्चवरुन जरी फोटो हटवला तरी वेबसाईटवरुन तो हटवता येणार नाही. परंतु गुगलच्या या नव्या धोरणामुळे युवकांना त्यांच्या डिजिटल फुटप्रिन्ट्सवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. 

महत्वाचं म्हणजे 13 वर्षाच्या आतील वयाच्या यूजर्सना गुगलवर अकाउंट उघडता येत नाही. पण संबंधित अकाउंट हे 13 वर्षाच्या वयाच्या वरच्या यूजर्सचे आहे की बनावट आहे हे तपासण्यासाठी गुगलकडे सध्या कोणतेही साधन नाही. त्यामुळे येत्या काळात गुगल आपल्या यूट्यूब, गुगल सर्च अॅप, आणि इतर साईटवर बदल करण्याच्या तयारीत आहे. 

ज्या कन्टेन्टला यंग यूजर्सनी सर्च केलं नाही तो कन्टेन्ट गुगलवर दाखवला जाणार नसल्याचंही गुगलने स्पष्ट केलं आहे. तसेच गुगल आता नवीन सुविधा सुरु करण्याच्या तयारीत आहे. इंटरनेटवरील कोणतं अॅप हे प्रौढांसाठी आहे याची माहिती गुगल आता 18 वर्षांच्या आतील यूजर्सना आणि त्यांच्या पालकांना देणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Google #आत #वरषचय #आतल #यजरस #सरच #इजनवरन #आपल #फट #डलट #करणयसठ #वनत #कर #शकणर

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

मुंबईच्या तुफान पावसात बोमन इराणींनी म्हटली मराठी कविता; पाहा Video

मुंबई 1 जुलै: हिंदीतील एक कुशल अभिनेता म्हणून बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव घेतलं जातं. बोमन इराणी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने...

Dharmaveer : ‘धर्मवीर’ ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा

Dharmaveer : 'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील...

अखेर नट्टू काका पुन्हा दिसणार! ‘तारक मेहता…’ मालिकेत नवीन कलाकाराची एण्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अनेक वर्षे या मालिकेत घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही...

शिंदेंच्या बंडखोर गटानं मुक्काम केलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं बिल किती? समोर आला आकडा

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा मुक्काम गुवाहाटीतील रॅडिसन ब्ल्यूमध्ये होता. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार ८ दिवस गुवाहाटीत होते. या हॉटेलचं बिल...

तरुणानं बॉसला मेसेज करताना वापरला असा शब्द, Whatsapp चॅटचा स्क्रीनशॉट व्हायरल

बॉसला व्हॉट्सऍप मेसेज किंवा ईमेल पाठवण्यापूर्वी आपण 10 वेळा विचार करतो किंवा तो मेसेज 10 वेळा वाचतो कारण, बॉससमोर एखादी चूक देखील आपल्याला...

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...