Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा

Gmail वर आलेला अनोळखी Email नेमका कोणी पाठवला? या ट्रिकने असं तपासा


नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : ऑफिस तसंच इतरही अनेक कामांसाठी Gmail चा वापर केला जातो. जीमेलवर अनेक ईमेल (Email) येत असतात. परंतु त्याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसते. पण हे अनोळखी ईमेल नेमके कुठून येतात, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह असतं. आता असेच अनोळखी ईमेल नेमके कोणी पाठवले याबाबत माहिती मिळवता येऊ शकते. अशा ईमेलच्या  IP Address, लोकेशन याबाबतची माहिती एका ट्रिकद्वारे घेता येऊ शकते.

Facebook –

युजर्स Facebook वरुन अनोळखी ईमेलबाबतची माहिती घेऊ शकतात. एखादा Email सतत येत असल्यास, Email ID कॉपी करुन फेसबुक सर्च बारमध्ये सर्च करता येऊ शकतात. जर त्या युजरने फेसबुक आणि ईमेल या दोघांसाठी सारख्याच Email ID चा वापर केला असेल, तर ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती Facebook Account वरुन मिळवता येऊ शकते.

PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम

Website –

Pipl आणि Spokio या वेबसाईट्सच्या मदतीने युजर्स ईमेल पाठवणाऱ्याची माहिती मिळवू शकतात. या वेबसाईट्सद्वारे Email च्या लोकेशनसह इतरही माहिती मिळेल.

– सर्वात आधी आलेला ईमेल ओपन करा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

– त्यावर क्लिक केल्यानंतर Show Original वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. इथे IP Address मिळेल.

– हा IP Address कॉपी करुन Wolfram Alpha वेबसाईटवर जावं लागेल आणि आलेल्या ईमेलचा IP Address सर्च करावा लागेल. इथे मेलचं लोकेशनही समजेल.

इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

दरम्यान, जगभरात पर्सनल ईमेलसाठी Gmail चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जीमेल अकाउंट सिक्योर ठेवण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two Step Verification) चाही वापर करता येतो. Two Step Verification चं वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्याला तुमचा पासवर्ड समजला, तरी तो पासवर्डद्वारे ईमेल ओपन करू शकत नाही. कारण अकाउंट ओपन करण्यासाठी पासवर्डसह व्हेरिफिकेशन कोडचीही गरज असते, जो तुमच्या मोबाईलवर येतो. जोपर्यंत व्हेरिफिकेशन कोड टाकला जात नाही, तोपर्यंत अकाउंट ओपन होणार नाही. त्यामुळे जीमेलच्या सुरक्षेसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन इनेबल करणं फायद्याचं ठरतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Gmail #वर #आलल #अनळख #Email #नमक #कण #पठवल #य #टरकन #अस #तपस

RELATED ARTICLES

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Todays Headline 13th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

Most Popular

Todays Headline 12th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...