Saturday, November 27, 2021
Home विश्व GF साठी कायपण! अभ्यासात ढ प्रेयसीची परीक्षा द्यायला पोहोचला तरुण; मुलीप्रमाणेच नटलाही...

GF साठी कायपण! अभ्यासात ढ प्रेयसीची परीक्षा द्यायला पोहोचला तरुण; मुलीप्रमाणेच नटलाही पण अशी झाली पोलखोल


नवी दिल्ली 18 ऑगस्ट : आपण असं अनेकदा ऐकलं असेल की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. एका व्यक्तीनं हेच वाक्य अधिक गंभीरतेनं घेतलं आणि असं काही केलं की थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. या व्यक्तीची गर्लफ्रेंड (Girlfriend) ज्या विषयांमध्ये कमजोर होती त्या विषयांचे पेपर देण्यासाठी हा तरुण स्वतःच पोहोचला. यासाठी आरोपीनं आपल्या गर्लफेंडचे कपडेही घातले आणि तिच्या नावानं पेपर देण्यासाठी आला. मात्र, ऐनवेळी त्याची पोलखोल झाली. ही घटना आफ्रिकी देश सेनेगलमधील (Senegal) आहे.

स्थानिक मीडिया पल्स सेनेगलनं दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान (University Exams) घडली. परीक्षेच्या दरम्यान शिक्षकांना (Teachers) एका युवतीवर संशय आला. जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा समजलं, की ज्या व्यक्तीला ते मुलगी समजत होते, तो एक मुलगा आहे. चौकशीत आरोपीनं सांगितलं, की तो आपल्या गर्लफ्रेंडच्या जागी परीक्षा देण्यासाठी आला आहे. यानंतर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं आणि पोलिसांनी आरोपीला अटक केलं.

VIDEO: हवेतच लष्काराच्या विमानानं घेतला पेट; कॅमेऱ्यात कैद झाला तो थरारक क्षण

आरोपीचं नाव खादीम बॉप (Khadim Mboup) असं आहे. तो आपल्या 19 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा पेपर देण्यासाठी पोहोचला होता. विद्यापीठातील स्टाफला संशय येऊ नये यासाठी तो अगदी आपल्या गर्लफ्रेंडप्रमाणेच तयार झाला होता. त्यानं ट्रेडिशनल स्कार्फ, कानातलं घालत मेकअपही केला होता. इतकंच नाही तर त्यानं आपल्या गर्लफ्रेडची अंतरवस्त्रेही घातली होती. यानंतर त्यानं परीक्षा केंद्रात प्रवेश मिळवला, सलग तीन दिवस त्यानं असंच केलं, मात्र चौथ्या दिवशी तो पकडला गेला.

खरंच प्रेमात आंधळा झाला! गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्याच्या नादात शेकडोंचा जीव पणाला

परीक्षेच्या दरम्यान एका निरीक्षकाला खादीमवर संशय आला. जेव्हा तपासणी केली गेली तेव्हा त्याची पोलखोल झाली. हे प्रकरण या महिन्याच्या सुरुवातीचं असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी खादीमविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पकडला गेल्यानंतरही त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला संकटात येऊ दिलं नाही. त्यानं पोलिसांना सांगितलं, की त्याच्या गर्लफ्रेंडला याबाबत काहीही माहिती नसून हे पूर्ण प्लॅनिंग त्याचंच होतं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#सठ #कयपण #अभयसत #ढ #परयसच #परकष #दययल #पहचल #तरण #मलपरमणच #नटलह #पण #अश #झल #पलखल

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Box Office Report: बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

Box Office Report :   चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्व सिनेमा प्रेमींनी थिएटर्सकडे धाव घेतली. अभिनेता अक्षय कुमारचा  (Akshay Kumar)...

जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे...

Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन

Bigg Boss 15 : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस सध्या चर्चेत आहे. या शोचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता...