Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट Free Fire: ‘या’ ५ गन स्किन आहेत सर्वोत्तम, ठराविक प्लेअर्सलाच मिळते वापरण्याची...

Free Fire: ‘या’ ५ गन स्किन आहेत सर्वोत्तम, ठराविक प्लेअर्सलाच मिळते वापरण्याची संधी


गेल्या काही दिवसांमध्ये भारतात अ‍ॅक्शन गेम खेळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पबजी, कॉल ऑफ ड्यूटी, फ्री फायर सारख्या गेम्सची लोकप्रियता भारतात वाढल्याची दिसत आहे. Garena Free Fire ही बॅटल रॉयल गेम देखील भारतात अनेकजण खेळताना पाहायला मिळतात. Garena Free Fire मध्ये आउटफिट्स आणि वेपन स्किन्स गेमचा मोठा भाग आहे. प्लेअर्स यामध्ये आपल्या आउटफिटपासून ते शस्त्रांपर्यंत कस्टमाइज करू शकतात. या गेममध्ये पेट, थीम्ड ग्लू वॉल स्किन, इमोट्स आणि वेपन स्किन मिळतो. इमोट्स आणि आउटफिटसोबतच या गेममध्ये गन स्किन खूपच लोकप्रिय आहे. प्लेअर्सला या गन स्किनला पसंती देताना दिसतात. इतर बॅटल रॉयल गेम्सच्या उलट फ्री फायरमध्ये गन स्किन बंदुकीमध्ये अनेक सुविधांचा समावेश करते व याची क्षमता अधिक वाढवते. फ्री फायरमध्ये मिळणाऱ्या अशाच काही गन स्किन्सची माहिती जाणून घेऊया, जी मोजक्याच प्लेअर्सला मिळते.

​Draco Blue Flame

draco-blue-flame

Garena Free Fire गेममध्ये Draco Blue Flame ही अशी गन स्किन्स पैकी एक आहे जी सहज प्लेअर्सला मिळत नाही. प्लेअर्स याद्वारे शस्त्रांच्या Evo Section मध्ये पाहू शकतात. या गन स्किन्समध्ये अनेक सुविधा मिळतात. यामध्ये किल फीड्स, किल अनाउंसमेंट इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. याआधी ही गन स्किन फ्री फायर गेममध्ये Faded Wheel Section चा भाग होती. Garena Free Fire मध्ये या गन स्किनचा नक्कीच फायदा होईल.

​Imperial Rome Kar98k

imperial-rome-kar98k

Garena Free Fire गेममध्ये Kar98k हे सर्वात पॉवरफुल शस्त्रांपैकी एक आहे. या शस्त्राला Imperial Rome स्किन अधिकच पॉवरफुल बनवते. रिगल गोल्ड आणि ब्लॅक डिझाइनसह येणारी Imperial Rome गन स्किन बंदुकीची मारक क्षमता देखील वाढवते. या गन स्किनमुळे शस्त्राची मारक क्षमता दुपटीने वाढते. मात्र, यामुळे गनचे अचुकतेवर देखील काहीसा प्रभाव पडतो. Imperial Rome गन स्किनद्वारे लाँग रेंजमध्ये देखील अचूकपणे निशाणा साधता येतो.

​Venom M4A1

venom-m4a1

ग्रे आणि ग्रीन रंगाचे Venom M4A1 गन स्किनचे कॉम्बिनेशन हे शस्त्रांना इतरांपेक्षा खूपच वेगळे बनवते. या Garena Free Fire गेममध्ये खूप कमी लोकांना Venom M4A1 गन स्किन मिळते. यामध्ये स्पेशलाइज्ड किल फीड आणि अ‍ॅनिमेशन इफेक्ट देण्यात आले आहे. याशिवाय Venom M4A1 गन स्किन शस्त्रांचे डॅमेज आणि रेट ऑफ फायर देखील वाढवते. मात्र, याचा एक तोटा देखील आहे. यामुळे गनची रेंज लिमिट देखील कमी होते.

​Swordsman Legends SVD

swordsman-legends-svd

ही गन स्कीन Swordsman Legends ग्लू वॉल स्किनप्रमाणेच एकदम खास दिसते. ही गन स्किन चमकदार गुलाबी रंगाची आहे व सोबतच यात गोल्ड पॅटर्न देखील येतो. Swordsman Legends SVD गन स्किनमध्ये लाइटिंग इफेक्ट देखील मिळतो. मात्र, हा इफेक्ट काही सेकंदच काम करतो. या गन स्किनमुळे डॅमेट रेट आणि मॅग्झिनची क्षमता खूपच वाढते. मात्र, या गन स्किनचा तोटा म्हणजे यामुळे शस्त्राच्या अचुकतेवर देखील प्रभाव पडतो.

​Predatory Cobra

predatory-cobra

Garena Free Fire गेममध्ये या गन स्किनला कमी समजले जाते. ही गन स्किन Cobra Strike ग्लू वॉल स्किनशी साम्य असणारी आहे. गन स्किन रेड आणि ब्लॅक रंगाच्या आकर्षक डिझाइनसह येते. Predatory Cobra गन स्किनमध्ये लाइटनिंग अ‍ॅनिमेशन देखील मिळते. Predatory Cobra एक Evo गन स्किन आहे. या गन स्किनमध्ये किल इफेक्ट, किल अनाउंसमेंट सारखे फीचर्स देखील मिळतात. त्यामुळे पुढील वेळी गेम खेळताना तुम्ही ह्या गन स्किन्सचा नक्कीच विचार करू शकता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Free #Fire #य #५ #गन #सकन #आहत #सरवततम #ठरवक #पलअरसलच #मळत #वपरणयच #सध

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Pune Crime News: एफडीए आणि हडपसर पोलिसांनी 52 लाख रुपयांचा गुटखा केला जप्त

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune)हडपसर पोलिस ठाण्याच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार...

VIDEO: नीरज चोप्राची नवी भरारी, स्वत:चाच रेकॉर्ड तोडला

नवी दिल्ली, 01 जुलै : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने नव-नवीन विक्रमांची नोंद करणे सुरूच...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर Alia Bhatt कडून नवीन फोटो शेअर, चाहते म्हणाले…

अभिनेत्री आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Amit Shah : मुंबई कार्यालय ते नागपूरपर्यंत भाजपच्या पोस्टर्सवरून थेट अमित शाहच गायब!

Devendra Fadnavis vs Amit Shah : काल राज्यामध्ये अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती पाहायला मिळाली. गेल्या दहा दिवसांपासून सुरू...

Nia Sharma पुन्हा एकदा बोल्डनेसचमुळे चर्चेत, पाहा सिझलिंग लुक

Nia Sharma पुन्हा एकदा बोल्डनेसचमुळे चर्चेत, पाहा सिझलिंग लुक अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...