Thursday, May 26, 2022
Home विश्व Firing in New York : न्यूयॉर्कमध्ये सूपर मार्केटमध्ये गोळीबार, 10 जणांचा मृत्यू

Firing in New York : न्यूयॉर्कमध्ये सूपर मार्केटमध्ये गोळीबार, 10 जणांचा मृत्यू


New York Firing : न्यूयॉर्कमध्ये बफेलो येथील सूपर मार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ‘टॉप्स फ्रेंडली’ सूपरमार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. गव्हर्नर कॅथी होचुल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बफेलो येथील किराणा दुकानातील घटनेबाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुढील तपास आहे. 

बफेलो येथील पोलीस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानं हेल्मेट घातलं होतं. पोलिसांनी गोळीबारात 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याचं सांगितलं आहे. 

मार्केटमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सेक्युरिटी गार्डच्या मानेवर बंदुक धरली होती. मात्र, पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये झालेल्या संभाषणानंतर आरोपीनं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. 

गोळाबाराचा व्हिडीओ समोर
एफबीआयच्या पथकाकडून संशयिताची चौकशी सुरु आहे. पोलीस आणि तपास पथकाला संशय आहे की गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. सध्या गोळीबाराच्या समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आरोपी पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरुन बसलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला. व्हिडीओमध्ये आरोपी सुपरमार्केटमध्ये शिरताना दिसत आहे. आरोपी मार्केटमध्ये आत शिरताच अनेक लोकांना अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात करतो.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Firing #York #नययरकमधय #सपर #मरकटमधय #गळबर #जणच #मतय

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

‘हे करताना मला….’; अभिनेत्री प्रिया मराठेचा VIDEO चर्चेत

मुंबई, 26 मे: सध्या टेलिव्हजनवर अनेक आशयाच्या आणि नव्या विषयाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातली सध्या एका मालिकेची चर्चा आहे ती म्हणजे...

Ahmednagar : निघोजची दारूबंदी कायदेशीरच; उच्च न्यायालयाने दारुविक्रेत्यांची याचिका फेटाळली

Ahmednagar Nighoj Liquor ban latest updates   : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे सहा वर्षांपूर्वी झालेली दारुबंदी कायदेशीरच...

तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

मुंबई, 26 मे : शनीची उलटी चाल कुंभ राशीत सुरू होणार आहे. 05 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होईल. रविवार,...

एलिमिनेटर सामन्यात बंगळुरुचा लखनऊवर थरारक विजय, क्वॉलिफायर-२ मध्ये राजस्थानसोबत करणार दोन हात

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये आज एलिमिनेटर लढत खेळवली गेली. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघांमध्ये खेळवलेल्या...

मुलांच्या आहारात फळं-भाज्या असायला हव्या; त्यांच्या एकाग्रतेमध्ये असा होतो फायदा

नवी दिल्ली, 26 मे : आजच्या जीवनशैलीत फास्ट-फूडच्या वाढत्या वापरामुळे आहारातील फळे आणि भाज्यांचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या नैसर्गिक...