Saturday, August 20, 2022
Home लाईफस्टाईल Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी

Eye Care Tips : पावसाळ्यात अशी घ्या डोळ्यांची काळजी


Eye Care Tips : पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. त्यामुळे या ऋतूत स्वत:ला निरोगी ठेवणे हे एक आव्हान असते. पावसाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात. कधी कधी डोळ्यात घाण पाणी आल्याने इन्फेक्शन आणि डोळे लाल होण्यासारख्या समस्या निर्माण होतात. डोळे सर्वात संवेदनशील आणि नाजूक असतात त्यामुळे त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्यात काळजी घेण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.

डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, (मुंबई) इथल्या सल्लागार नेत्रविकारतज्ज्ञ, डॉ. स्नेहा मधुर कंकरिया सांगतात की, “पावसाळ्यात स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. डोळ्यात काही समस्या असल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांचा उपचार कधीही करु नये, असे केल्याने समस्या वाढण्याची शक्यता आहे.” 

स्वच्छता राखा : पावसाळ्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करु नका. डोळ्यांना स्पर्श करु नका/ चोळू नका, कारण हातावर हजारो जीवाणू असू शकतात, जे तुमच्या डोळ्याला संसर्ग करु शकतात.

पाणी साचलेल्या जागा टाळा : कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी असू शकते.

कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी घ्या : कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात धुवावेत. कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशनच्या एक्स्पायरीच्या तारखेवर लक्ष ठेवावे.
 
कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे कारण संसर्गाची जोखीम वाढलेली असते. त्याऐवजी या कालावधीत चष्मा वापरावा.
 
कंजन्क्टिव्हायटिस (डोळे येणे), रांजणवाडी, कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे संसर्ग आहेत. डोळे लाल झाले, चिकट द्रव बाहेर येथ असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असतील, दृष्टी धूसर झाली असेल तर तातडीने नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी. ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेणे टाळावे.

पावसाच्या धारांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा
 
तुमच्या डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे, कारण त्यात डोळे चुरचुरवणारे घटक असू शकतात.

डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन शेअर करु नयेत. डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये कारण त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला आणि दुसऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी सकस आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक असू शकतात.

डोळ्यांचा मेकअप टाळा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरु शकतो.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculatorअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Eye #Care #Tips #पवसळयत #अश #घय #डळयच #कळज

RELATED ARTICLES

रिकाम्या खुर्च्या अन् थिएटरमध्ये सन्नाटा! तापसीच्या ‘दोबारा’कडेही प्रेक्षकांनी फिरवली पाठ!

Do baaraa : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिचा बहुचर्चित ‘दोबारा’ (Dobaaraa) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला...

World Mosquito Day 2022 : मलेरिया आणि इतर डासांपासून पसरणारे रोग

डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या आजारांना डासांमुळे होणारे आजार असे म्हणतात. डास झिका विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, चिकुनगुनिया विषाणू, डेंग्यू आणि मलेरिया मानवांमध्ये प्रसारित करू...

दाभोळकरांच्या हत्येला नऊ वर्ष, पुण्यात अंनिसकडून निर्भया वॉक, आढावांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत....

Most Popular

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

दाभोळकरांच्या हत्येला नऊ वर्ष, पुण्यात अंनिसकडून निर्भया वॉक, आढावांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोळकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत....

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...