Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या Exclusive: डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी नेते, NIAच्या तपासात मोठे खुलासे

Exclusive: डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी नेते, NIAच्या तपासात मोठे खुलासे


मुंबई, 13 मे : पाकिस्तानच्या हातातील ISI या दहशतवादी संघटनेच्या छत्रछायेखाली लपून बसलेल्या डी गॅंगच्या (D Gang) खुरापती काही संपायच्या नाव घेत नाही. दहशतवादी कारवाया करणारा दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आता राजकीय नेत्यांच्या (politicians) मुळावर उठलाय, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासातून समोर आला आहे. जो कधी आपल्या देशाचा झाला नाही तो पाकिस्तानचा काय होणार? पण आपल्याला पाकिस्तानमध्ये लपून राहायला मिळावे यासाठी अंडरवर्ल्ड डॅान दाऊद इब्राहिम हा सतत भारता विरोधात काही ना काही तरी खुरापती करतच असतो. त्यात आता त्याचा एक नवीन कारनामा समोर आलाय. दहशतवादी कारवाया घडवून आणणारा दाऊद आता राजकीय नेत्यांना टार्गेट करत आहे. त्यात विशेष करुन हिंदूत्ववादी नेत्यांचा समावेश आहे, असा धक्कादायक खुलासा NIA च्या तपासात झाला आहे.

NIAने 9 मे रोजीच्या पहाटे मुंबईसह नालासोपारा आणि इतर असे एकूण 27 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यानंतर NIAने 57 लोकांना चौकशीकरता बोलावले होते. ज्यापैकी 18 जणांची NIA कसून चौकशी करत होती. त्यापैकी छोटा शकीलचे नातेवाईक आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात NIAला ठोस पुरावे आढळल्याने त्यांना NIAने 13 मेच्या पहाटे अटक करुन कोर्टात हजर केले.

1993 च्या बॅाम्बस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. पण नंतर पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या नंतरही हे दोघे छोटा शकील मार्फत डी गॅंगच्या संपर्कात आहेत. हे अनेकदा समोर आले होते. पण देशात घातपात घडवण्यासाठी डी गॅंग रचत असलेल्या कटात हे दोघे शामिल होते, याचा खुलासा आज NIA ने कोर्टात केलाय.

(ताजमहालाविषयी मोठी बातमी! पुरातत्व विभागाने सांगितलं, ‘याचिकेत म्हटल्याप्रमाणे त्या खोल्या..’)

या आरीफ आणि शब्बीर यांची बहिणी ही छोटा शकीलची पत्नी आहे. त्यामुळे भाई के सगे वाले म्हणून आरीफ आणि शब्बीर त्यांच्या भागात कुप्रसिद्ध होते. NIAने फेब्रुवारी महिन्यात टेरर फंडिंग प्रकरणी FIR दाखल केली होती. तेव्हापासून हे दोघे NIA च्या रडावर होते. त्यांच्या अटकेमुळे या प्रकरणी NIAला मोठी माहिती हाती लागली आहे.

आरीफ आणि शब्बीर हे छोटा शकील मार्फत दाऊदच्या संपर्कात होते. छोटा शकील पाकिस्तानातून जे क्रिमिनल सिंडिकेट चालवतो त्या सिंडिकेटमध्ये दोन्ही आरोपी महत्वाची भूमिका बजावतात. तसेच खंडणी, अंमली पदार्थ तस्करी, दहशतवादी कृत्य यांत या दोन्ही आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावेआढळले आहे. डी गॅंगने भारतात घातपात घडवण्याचा कट रचला होता त्यात यांची महत्वाची भूमिका होती. डी गॅंगच्या टार्गेटवर काही हिंदुत्ववादी राजकीय नेते होते तर काही इतर राजकीय नेते संपर्कात होते. त्यांची एक लिस्ट आहे ज्याची माहिती या दोघांना आहे.

हिंदूत्ववादी राजकीय नेते डी गॅंगच्या टार्गेटवर होते. तसेच इतर राजकीय नेते डी गॅंगच्या संपर्कात होते. हे कोण राजकीय नेते आहेत, तसेच दाऊद आणि छोटा शकील कुठे आहेत, त्यांचे ठिकाण शोधून काढायचे आहे, असं NIAने आपल्या कोठडी अहवालात युक्तिवाद केला. ज्यामुळे दोन्ही आरोपींना विशेष NIA कोर्टाने 20 मे पर्यंत NIA कोठडी सुनावली आहे. यामुळे आता या तपासात पुढे काय खुलासा होतो ते पाहणं महत्वाचे ठरेल.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

  Exclusive : डी गॅंगच्या टार्गेटवर हिंदुत्ववादी राजकीय नेते, मोठा घातपात घडवण्याचा कट, NIAच्या तपासात मोठा खुलासा

 • "आम्ही चॅलेंज स्वीकारलं; ...तुम्हालाही त्याच मातीत गाडणार" औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

  “आम्ही चॅलेंज स्वीकारलं; …तुम्हालाही त्याच मातीत गाडणार” औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांचा इशारा

 • Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

  Terror Funding Case : दाऊद इब्राहिम, छोटा शकीलच्या काळ्या धंद्यांचे हस्तक, आरोपींनी कोर्टात गायलं देशभक्ती गीत

 • Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

  Weather Update: उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा ; पण आपल्याच राज्यात या गावात स्वेटर चढवण्याएवढा गारठा

 • Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

  Anil Deshmukh यांना मोठा झटका, खासगी रुग्णालयात उपचाराला कोर्टाचा नकार

 • मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

  मोठी बातमी ! डी गँगसोबत संबंध असलेल्या दोघांना NIAने ठोकल्या बेड्या, छोटा शकीलच्या सोबतीने सुरू होते गैरव्यवहार

 • "पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..." नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

  “पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…” नितेश राणेंचं ओपन चॅलेंज

 • Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

  Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन

 • Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

  Thane CCTV: वर्दीतील देवमाणूस! स्वत:चा जीव धोक्यात टाकून वाचवले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा LIVE VIDEO

 • महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण....

  महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज ठाकरेंसाठी Y प्लस दर्जाची सुरक्षा, पण….

 • Heat wave : जळगावचा पारा 45.5 अंशांवर... विदर्भातही 45 ला टेकला, उष्णतेच्या लाटेचा alert

  Heat wave : जळगावचा पारा 45.5 अंशांवर… विदर्भातही 45 ला टेकला, उष्णतेच्या लाटेचा alert

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Exclusive #ड #गगचय #टरगटवर #हदतववद #नत #NIAचय #तपसत #मठ #खलस

RELATED ARTICLES

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

ज्याची भिती होती ते घडलंच; भारतात कोरोनाच्या सब-व्हेरिएंटचा सापडला पहिला रूग्ण

ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट सापडल्याने पुन्हा नवं संकट उभं राहिलं आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

Most Popular

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Live Updates: मुंबई महापालिकेच्या शाळेतील 130 शिक्षक निलंबित

ओबीसी आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी भाजपचं शिष्टमंडळ  1 जूनला मध्य प्रदेशात जाणार,  पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिष्टमंडळ मध्य प्रदेशात जाणार;  चंद्रशेखर बावनकुळे, योगेश टिळेकर, प्रवीण घुगेंसह पदाधिकाऱ्यांचा...