Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल Excessive Sweating : बापरे, तुम्हालाही येतो प्रचंड घाम? मग असू शकतो गंभीर...

Excessive Sweating : बापरे, तुम्हालाही येतो प्रचंड घाम? मग असू शकतो गंभीर आजार, आयुर्वेदिक एक्सपर्टने सांगितली खाण्याची व अंघोळ करण्याची ट्रिक..!


उन्हाळ्यात घाम येणे सामान्य आहे. घाम येणे ही शरीराच्या आवश्यक क्रियांपैकी एक आहे. त्यामुळे शरीरातील घाण व विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमकही कायम राहते. याव्यतिरिक्त, ते वजन, मूड आणि झोपेवर सकारात्मक परिणाम करते. पण काही लोक असे असतात ज्यांना खूप घाम येतो. कोणत्याही आजाराशिवाय किंवा शारीरिक हालचाल न करता आणि गरमी नसतानाही घाम येणे आरोग्यासाठी चांगले नाही. जेव्हा शरीरातील घाम काढून टाकणाऱ्या ग्रंथी अतिक्रियाशील किंवा ओव्हर अॅक्टिव्ह होतात तेव्हा ही समस्या उद्भवते.

आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी घाम जास्त येत असल्याने त्रासलेल्या लोकांसाठी हजारो वर्ष जुन्या वैद्यकीय प्रणालीच्या मास्टर्सच्या काही टिप्स शेअर केल्या आहेत. जास्त घाम येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पित्तदोषाचे प्रमाण वाढणे आहे असे त्या सांगतात. हा पित्तदोष संतुलित करून शरीराची दुर्गंधी आणि गरमीची समस्या कमी करता येऊ शकते.

काही लोकांना का येतो जास्त घाम?

आयुर्वेदिक तज्ञ सांगतात की जास्त घाम येण्याची दोन कारणे असू शकतात.

  • पहिले कारण – जर कोणताही आजार नसतानाही जास्त घाम येत असेल तर त्यामागे ज्या ग्रंथी हा घाम बाहेर फेकतात त्या जबाबदार असतात. या ग्रंथी ओव्हर अॅक्टिव्ह किंवा प्रमाणापेक्षा जास्त सक्रिय होतात तेव्हा शरीराला सामान्यपेक्षा जास्त घाम येऊ लागतो.
  • दुसरे कारण – जेव्हा एखादी व्यक्ती थायरॉईड ग्रंथीचे विकार, मधुमेह, रजोनिवृत्ती (menopause), ताप, अस्वस्थता आणि हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असते.

(वाचा :- Herbs for Weight loss : पोट, कंबर व मांड्यावरची चरबी लोण्यासारखी वितळू लागेल, रोज खा घरात उगवणारी ‘ही’ 5 पाने..!)

ही ड्रिंक्स करतात घाम येण्याची समस्या कमी

  • धण्यांचे पाणी – धणे बारीक वाटून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा.
  • खसचे पाणी– साधे पाणी पिण्याऐवजी खसचे पाणी दिवसभर प्यावे. यासाठी एक चमचा खसची मुळं 2 लिटर पाण्यात 20 मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून त्याचे सेवन करा.

(वाचा :- Heart Attack : सावधान, ‘हे’ 5 पदार्थ खात असाल तर हृदय व जीव आहे भयंकर धोक्यात, हळू हळू रक्ताच्या नसा करतात बंद..!)

शरीरावर हा लेप व हे चूर्ण पाण्यात मिसळून आंघोळ करा

  • शरीरावर हा लेप लावा – पांढर्‍या चंदनाचा लेप बनवून घाम येत असलेल्या ठिकाणी लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी धुवा.
  • साध्या पाण्याने आंघोळ करू नका – 20 ग्रॅम नाल प्रमादी चूर्ण पाण्यात 15 ते 20 मिनिटे टाका. त्यानंतर ते पाणी गाळून त्याने आंघोळ करा.

(वाचा :- Yoga Day 2022 : किडनी व लिव्हरचे आजार आसपासही भटकणार नाहीत, बसल्याजागी करा आयुर्वेदिक एक्सपर्ट्सनी सांगितलेली ‘ही’ 6 योगासने..!)

जास्त घाम येत असल्यास या गोष्टी खाऊ नका

  1. मसालेदार आणि आंबट अन्नपदार्थ कमी खा किंवा खाणंच टाळा.
  2. आहारात गरम पदार्थांचा समावेश करू नका.
  3. दररोज 10 भिजवलेले मनुके रिकाम्या पोटी खा.
  4. आहारात अधिक तुरट आणि गोड चवीचे पदार्थ खा.

(वाचा :- Yoga Day : 48 शीतही बोल्ड दिसणा-या मलायका अरोराने दिला चिरतरूण व फिटनेसचा मंत्र, मेटाबॉलिज्म बिघडलं तर वाढतं वजन व चरबी, रोज करते ‘ही’ 3 कामं..!)

मेडिकल सायन्स काय म्हणतं?

हायपरहाइड्रोसिस (Hyperhidrosis) ही एक सामान्य स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जास्त घाम येतो आणि त्याच्या शरीराला तापमान नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त घाम गाळावा लागतो. यामध्ये घामाचे प्रमाण सामान्यपेक्षा पाचपट जास्त असू शकते. Webmd वरील एका एक्सपर्ट लेखानुसार, सुमारे 3% लोकसंख्या हायपरहाइड्रोसिसने प्रभावित आहे. जास्त घाम येणे किंवा हायपरहाइड्रोसिस हे थायरॉईडची समस्या, मधुमेह किंवा संसर्गाचे चेतावणीची चिन्हे असू शकतात.

(वाचा :- Rainbow Diet : काय आहे रेनबो डाएट? जाणून घ्या याचे थक्क करणारे फायदे)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अधिक घाम येण्याची समस्या सोडवण्यासाठी घरगुती उपाय..!

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Excessive #Sweating #बपर #तमहलह #यत #परचड #घम #मग #अस #शकत #गभर #आजर #आयरवदक #एकसपरटन #सगतल #खणयच #व #अघळ #करणयच #टरक

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

उदयपुर प्रकरणावर ट्वीट केल्याने स्वरा भास्कर झाली ट्रोल, अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडे बोल

Swara Bhasker : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येनंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहेत. या घटनेचा सर्वांनी निषेध...

घरात स्नेक प्लांट लावण्याचे फायदे आहेत खास; कोणत्या दिशेला ठेवणं आहे शुभ

मुंबई, 04 जून : मानवी जीवन अनेक समस्यांनी आणि चढ-उतारांनी भरलेले आहे. जीवनाच्या कोणत्या वळणावर कोणत्या समस्या येऊ शकतात, हे कोणालाच जाणता येत...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...