Saturday, August 13, 2022
Home भारत EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

EVM च्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली


नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVM निवडणुकीच्या काळात नेहमीच चर्चेत येतं. ईव्हीएम मशीनविषयी विरोधकांकडून अनेकदा संशय उपस्थित करण्यात आला आहे. यातच आता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावत दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेला प्रसिद्धीसाठी दाखल केलेली याचिका म्हटले आणि याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. न्यायालयाने टिप्पणी केली की, याचिकाकर्त्याने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले, परंतु त्यांच्याकडे ईव्हीएमबद्दल विशिष्ट माहितीही नव्हती.

आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जगातील अनेक देशांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका सुरू झाल्या आहेत. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, ज्या देशांनी ईव्हीएमची सुरुवात केली होती तेही पुन्हा बॅलेट पेपरवर आले आहेत. आपल्या देशातील अनेक पक्षांच्या राजकारण्यांचाही  ईव्हीएमवर विश्वास नाही केवळ केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याला विचारले की, तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे, ज्या आधारावर तुम्ही हे बोलत आहात की ईव्हीएममध्ये गडबडी आहे. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएमचा वापर असंवैधानिक घोषित केला आहे. 

सरन्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, वकील सीआर जया सुकिन यांची याचिका अफवा आणि निराधार आरोप आणि अंदाजांवर आधारित आहे. याचिकाकर्त्याने ईव्हीएमच्या कामकाजावर कोणताही ठोस युक्तिवाद केलेला नाही. आम्हाला याचिकेवर सुनावणी करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. ही याचिका चार कागदपत्रांवर आधारित होती. सुकिन यांना स्वतः ईव्हीएमची अजिबात माहिती नव्हती.

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#EVM #चय #वशवसरहतवर #परशन #उपसथत #करणर #यचक #दलल #हयकरटन #फटळल

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यापर्यंत जाणून घ्या अक्रोडचे फायदे

Walnut Benefits : मधुमेह नियंत्रित करण्यापासून ते लठ्ठपणा कमी करण्यापर्यंत जाणून घ्या अक्रोडचे फायदे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मुंबईला क्रिकेटचे वेड लावणाऱ्या सचिनच्या मुलाला का सोडावं लागलं शहर; निर्णय ठरणार गेमचेंजर?

Arjun Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. सचिनच्या मुलानेही क्रिकेट विश्वात पदार्पण केलं. इंडियन प्रीमियर लीग, रणजी ट्रॉफीमध्ये...

Sanjay Sirsath : शिंदेंनी शब्द दिला होता, मी मंत्रिमंडळात राहणार- शिरसाट

शिंदेंनी शब्द दिला,मी मंत्रिमंडळात राहणार, ठाकरे सरकारमध्येही यादीत नाव असताना वगळलं होतं, मंत्रिमंडळात मी असणार- संजय शिरसाट अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ!

असा साजरा केला सनी लिओनीने रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या कोण आहे या अभिनेत्रीचा भाऊ! अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

पाऊस फुल अन् धरणं हाऊसफुल्ल

<p><strong>Pune Rain Update:</strong> पुणे (Pune) जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी (Dam) 18 धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे....

पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली; मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प

Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा आणि लोणावळ्यादरम्यान दरड कोसळल्यानं पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प...