Saturday, August 13, 2022
Home क्रीडा England vs India, 1st Test | टीम इंडियाची झोकात सुरुवात, बुमराहकडून इंग्लंडला...

England vs India, 1st Test | टीम इंडियाची झोकात सुरुवात, बुमराहकडून इंग्लंडला पहिल्याच ओव्हरमध्ये धक्का


नॉटिंघम : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना ((England vs India 1st Test) खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. परदेशी भूमीवर टीम इंडियाने या पहिल्या कसोटीत झोकात सुरुवात केली आहे. फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडला टीम इंडियाने पहिला धक्का दिला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर इंग्लंडचा फलंदाज भोपळा न फोडता तंबूत परतला आहे. (England vs India 1st Test at Nottingham Jaspreet Bumrah lbw out Rory Burns in the fifth ball of the first over) 

टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर बुमराहने  रॉरी बर्न्सला ( Rory Burns) एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडने धावांचं खातं उघडण्याआधी बुमराहने टीम इंडियासाठी विकेटचं खातं उघडलं.

अशी मिळाली पहिली विकेट

बुमराहने टाकलेला पाचवा चेंडू लेग स्टंपच्या लाईनवर पीच होऊन वेगाने आला. रोरी बर्न्सने तो चेंडू डिफेंड करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूने रोरीला चकवा दिला. चेंडू जाऊन पॅडवर लागला. यावर जोरजदार अपील करण्यात आली. अंपायरने रोरीला बाद घोषित केलं. या निर्णयाला आव्हान म्हणून रोरीने डीआरएस घेतला. पण त्याचा हा प्रयत्न फसला. डीआरसमध्येही रोरीला बाद असल्याचं घोषित केलं. अशा प्रकारे भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट मिळाली. बुमराहने पहिली विकेट मिळवून दिल्याने तो सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय. तसेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.   

बुमराह गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरतोय. त्याला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने आता पहिली विकेट घेत झोकात सुरुवात केली आहे. त्यामुळे बुमराह आता धमाका करेल, अशी आशा भारतीय चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टीम इंडियात सलामीला रोहित शर्माला साथ देण्यासाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तर 4 वेगवान गोलंदाजांमध्ये  मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरलाही संधी मिळाली आहे.  

टीम इंडिया :  रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.    

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | रोरी बर्न्‍स, डोमिनिक सिबली, जॅक क्रॉली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर (विकेटकीपर), सॅम कुरेन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स एंडरसन. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#England #India #1st #Test #टम #इडयच #झकत #सरवत #बमरहकडन #इगलडल #पहलयच #ओवहरमधय #धकक

RELATED ARTICLES

24 वेळा पाहिला अनुष्काचा सिनेमा; तो सीन पाहून पेटवून घेतलं, तरुणाचा मृत्यू

या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...

Track location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई: आजकाल असे बरेच अ‍ॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Most Popular

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दींवर न्यूयॉर्कमध्ये चाकूहल्ला, हल्लेखोराला अटक ABP Majha

<p>वादग्रस्त लिखाणामुळे अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी मिळालेले, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ लेखक सलमान रश्दींवर अमेरिकेत प्राणघातक हल्ला झालाय.. न्यूयॉर्कमधील शुटाका इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात भर...