Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज...

Email Scams: इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठा स्कॅम, लोकांनी गमावले तब्बल १८७ अब्ज रुपये; पाहा कसे?


नवी दिल्ली :Email Scams: इंटरनेटच्या जगात दररोज सायबर क्राइमच्या घटना घडत आहेत. लोकांच्या आर्थिक फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार नवनवीन मार्ग सोधत आहे. ज्याप्रमाणे खऱ्या जगात कोट्यावधीचे घोटाळे समोर येत आहेत, असेच काहीसे सायबर वर्ल्डमध्ये देखील घडत आहे. ऑनलाइन फ्रॉड आणि ईमेलशी संबंधित काही असेच घोटाळे समोर आले आहेत. बिझनेस ईमेल स्कॅम अथवा ईमेल अकाउंट कॉम्प्रमाइजमुळे वर्ष २०२१ मध्ये लोकांचे तब्बल २.४ अब्ज डॉलर्सचे (जवळपास १८७ अब्ज रुपये) नुकसान झाले आहे. या घोटाळ्यात बिझनेस आणि व्यक्तिगत असे दोन्ही अकाउंट्स सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर होते. ज्या अकाउंट्सचा फंड ट्रान्सफरसाठी वापर केला जातो, अशा अकाउंट्सला स्कॅमर्सने टार्गेट केले आहे.

वाचा: Movies Download Website: ‘या’ ५ वेबसाइट्सवरून मोफत डाउनलोड करता येईल लोकप्रिय चित्रपट-सीरिज, एकही रुपये खर्च नाही; पाहा लिस्ट

किती झाले नुकसान?

वर्ष २०२१ मध्ये अमेरिकेत याप्रकारचे सर्वाधिक स्कॅम झाले आहेत. FBI च्या रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एजन्सीनुसार, वर्ष २०२१ मध्ये बिझनेस आणि पर्सनल ईमेल स्कॅममध्ये लोकांनी २.४ अब्ज डॉलर्स गमावले आहेत. यात ५९ टक्के अमेरिका, ३८ टक्के ब्रिटन आणि ३ टक्के इतर ठिकाणी झाले.

वाचा: iPhone 14 खरेदी करायचाय? लाँचआधीच जाणून घ्या संभाव्य फीचर्स

कशी केली जाते लोकांची फसवणूक?

स्कॅमसाठी हॅकर्स स्पूफिंग अथवा पर्सनल ईमेल अकाउंट्सचा वापर कर असे. परंतु, आता फ्रॉडस्टर्स व्हर्च्यूअल मीटिंग प्लॅटफॉर्मचा वापर हॅकिंगसाठी करत आहे. याद्वारे बिझनेस लीडर्सचे क्रेडेंशियल चोरी केले जातात व फ्रॉड वायर्ड ट्रान्सफर केले जाते. या फ्रॉड वायर ट्रान्सफर्सला त्वरित क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले जाते. ज्यामुळे रिकव्हरी करणे अवघड होते.

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

असाच एक दुसरा गुंतवणूक घोटाळा आहे. अशाप्रकारचे अनेक स्कॅम समोर आले आहेत, ज्यात यूजर्सला गुंतवणुकीसाठी चुकीची माहिती दिली जाते. अशाप्रकारच्या स्कॅममध्ये गुंतवणुकदाराला कमी धोका पत्कारत जास्त रक्कम मिळवण्याचे आमिष दाखवले जाते. रिटायरमेंट, ४०१K, Ponzi आणि पिरामिड हे अशाप्रकारचेच घोटाळे आहेत. यामध्ये लोकांनी लाखो रुपये गमावले आहेत.

वाचा: Postpaid Plan: Netflix, Amazon Prime, Hotstar एकदम फ्री, पाहा ‘हे’ कमी किंमतीतील धमाकेदार प्लान्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Email #Scams #इटरनटचय #जगतल #सरवत #मठ #सकम #लकन #गमवल #तबबल #१८७ #अबज #रपय #पह #कस

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Health Tips : जास्त जांभूळ खात असाल तर वेळीच सावध व्हा; अन्यथा…

जांभळाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. वास्तविक, यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, अशा परिस्थितीत त्याचे जास्त सेवन करणे बद्धकोष्ठतेचे कारण असू...

Most Popular

Smartphone Offers: २७ हजारांच्या फोनवर मिळेल १५ हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा भन्नाट ऑफर

नवी दिल्ली :iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात iQOO Neo 6 ला लाँच केले होते. हा फोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येते. कंपनीने...

सुरक्षिततेच्या दृष्टिने UPI PIN बदलत राहणे आवश्यक, पिन बदलण्यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

UPI Payments: आजपासून काही वर्षांपूर्वी जर दुसऱ्या शहरात असलेल्या तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पैसे पाठवायचे असल्यास तुम्हाला मोठी प्रक्रिया करावी लागायची. त्यावेळी पैशांचा व्यवहार...

दिया मिर्झाने केले उद्धव ठाकरेंचे कौतुक, भडकले ‘द कश्मीर फाइल्स’फेम विवेक अग्निहोत्री

मुंबई: एखाद्या सिनेमा-मालिकेतील भासावेत असे 'ट्विस्ट अँड टर्न्स' महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रिपद सोडावे...

शूटिंगचा पहिला आठवडा आदितीसाठी होता कठीण, काय आहे कारण?

मुंबई 1 जुलै: मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकरचं (Aaditi Pohankar) नाव सध्या सॉलिड गाजताना दिसत आहे. (SHE season 2) तिच्या She या वेबसीरिजमधल्या कामामुळे...

मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक ‘रांगडा’ गडी! एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू

CM Eknath Shinde Exclusive : महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha

<p>Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 जुलै 2022 : शनिवार : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...