Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती? कुठे शिंकली माशी

Elon Musk यांच्याकडून Twitter खरेदीला तुर्तास स्थगिती? कुठे शिंकली माशी


टेस्ला कंपनीचे मालक Elon Musk या वर्षाच्या सुरुवातीपासूनच Twitter च्या डीलमुळे चर्चेत राहिले आहेत. एलोन मस्क यांनी ट्वीटर खरेदी करण्याची इच्छा एक दीड महिन्याआधी व्यक्त केली होती. या ट्वीटर खरेदीच्या डील नंतर एलोन मस्क जगभर चर्चेत आले होते. ट्वीटर हे जगभर वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप आहे. सेलेब्रिटी, राजकरणी ते विविध क्षेत्रातील लोक या अॅपचा वापर करतात.जगभरात 215 दक्षलक्षाहून अधिक ट्वीटर युजर्स आहेत भारतात सुमारे 2 कोटीहून अधिक लोक ट्वीटरचा वापर करतात. एलोन मस्क यांनी ट्वीटरसोबत 44 अब्ज डॉलरची डील केली होती, पण आज एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली 44 अब्ज डॉलर्सची डील मस्क यांनी थांबवली आहे. याबद्दल त्यांनी स्वत ट्वीट करत वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

एलोन मस्क म्हणाले..  

दरम्यान, एलोन यांनी ट्विट करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. आपल्या ट्विट मध्ये ऐलोन म्हणतात “ट्विटर डील तात्पुरते स्थगित करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे ट्वीटवर मोठ्या प्रमाणात बनावट खाती आहेत,प्रत्यक्षात 5 टक्क्यांहून कमी युजर्स आहेत ज्यांचे अकाउंट बनावट नाहीत,” त्यामुळे तुर्तास ट्वीटरच्या करार होल्डवर ठेवत आहे. इलॉन मस्क यांनी शुक्रवारी आपला निर्णय जाहीर करताना याचे कारणही ट्वीटमध्ये दिले आहे.

ट्वीटरच्या शेअर्समध्ये पडझड

या बातमीनंतर, ट्विटरचे कंपनीचे शेअर्स प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये 20 टक्क्यांनी घसरले आहेत. ट्विटरने ऍलनच्या ट्विटला लगेच प्रतिसाद दिला नाही. या तीन महिन्यांत खोट्या किंवा स्पॅम खाती कमी झाल्याचा अंदाज कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला व्यक्त केला होता. परंतू एलोन यांच्या ट्वीटमुळे हा अंदाज चुकलाय अशी शक्यता वर्तवली जाते. 

44 अब्ज डॉलर्सची डील

एलोन मस्क यांच्या या डीलनंतर ट्वीटरच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे सुद्धा पाहायला मिळाले, तर कंपनीत भरतीप्रक्रिया सुध्दा बंद करण्यात आली आहे. या 44 अब्ज डॉलर्सच्या डीलनंतर ट्वीटर मध्ये अनेक बदल होतील अशी युजर्संना आशा होती. तसेच अनेक युजर्स ट्वीटकरुन एलोन यांना ट्वीटमध्ये काय बदल करावेत याबाबत सूचना सुध्दा देताना पाहायला मिळत होते. 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी ट्वीटर करारापूर्वीच सपष्ट केले होते. ट्विटर प्लॅटफॉर्मवरून ‘स्पॅम बॉट्स’ काढून टाकणे हे त्यांचे प्राधान्य असेल. आता एलोन नेमके भविष्यात या डील बाबत काय निर्णय घेतात हे पाहणे महत्तवाचे असेल.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Elon #Musk #यचयकडन #Twitter #खरदल #तरतस #सथगत #कठ #शकल #मश

RELATED ARTICLES

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

Most Popular

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

Monkeypox Outbreaks : आफ्रिकेत ‘मंकीपॉक्स’चा उद्रेक! नवीन रोगामुळे शास्त्रज्ञांसमोर आव्हान

Monkeypox Outbreaks : गेल्या दोन वर्षांपासून, संपूर्ण जग आधीच कोरोना (Corona) महामारीने हैराण झाले आहे आणि लाखो लोकांना...