Elon Musk House : जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क हे एका 50 हजार डॉलर्स किमत असलेल्या एका बॉक्स टाईप घरात राहतात म्हटल्यावर कुणालाही पटणार नाही. पण हे सत्य आहे. हे घर अगदीच छोटंसं असून ते फोल्डेबल आहे. त्यामुळे एका ट्रकातून सहजपणे त्याचे स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी होऊ शकते.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीली इलॉन मस्क यांनी आपण टेस्कास जवळच्या बोका चिका या ठिकाणच्या एका भाड्याच्या घरात राहतोय असं सांगितलं होतं. स्पेस एक्स या त्यांच्या कंपनीच्या मालकीचे हे बॉक्स घर आहे.
Tiny homes have become a popular alternative to the classic family home or apartment, and @ElonMusk has reportedly jumped on the trend with a @_BOXABL prefab home.
Take a look inside one of its units. 👇 https://t.co/fU7uFXVkWf pic.twitter.com/QCm0rFpA32
— Insider Life (@InsiderLife) August 9, 2021
इलॉन मस्क आपल्या मिशन मंगळ मध्ये प्रचंड व्यस्त आहेत. मानवाला मंगळावर शिफ्ट करण्यासाठी स्पेस एक्स एक रॉकेट तयार करत आहे. त्या रॉकेटचे नाव आहे स्टारशिप. या रॉकेटची निर्मिती ज्या ठिकाणी करण्यात येत आहे ते ठिकाण म्हणजे स्टारबेस. या स्टारबेसच्या एरियामध्येच इलॉन मस्क यांचे हे छोटसं घर आहे.
This is an instant house that costs $50,000. Elon Musk lives in one.pic.twitter.com/F90H357AAZ
— Vala Afshar (@ValaAfshar) July 3, 2021
केवळ 50 हजार डॉलर्स किंमतीचे हे घर बॉक्सबेल या कंपनीची निर्मिती असून ते कॅसिटा मॉडेलचे आहे. महत्वाचे म्हणजे ते फोल्डेबल घर आहे. फोल्ड केल्यानंतर ते एखाद्या ट्रकच्या मदतीने दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी घेऊन जाता येतं आणि त्या ठिकाणी बसवता येतं.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात आपण बोका चिका या ठिकाणी कंपनीच्या एका टॉप सिक्रेट ग्राहकासाठी घराची निर्मिती करत आहोत असं बॉक्सबेल या कंपनीने सांगितलं होतं. त्यानंतर इलॉन मस्क यांनी आपल्या या घराबद्दल एक ट्वीट करुन माहिती दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की, “माझ्या या घराची किंमत 50 हजार डॉलर्स आहे. हे घर मी स्पेस एक्सकडून भाड्याने घेतलं आहे. हे खूप चांगलं आहे. जर मी याला विक्रीला काढलं आणि जोपर्यंत या घराला एखादं मोठं कुटुंब खरेदी करत नाहीत तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही.”
My primary home is literally a ~$50k house in Boca Chica / Starbase that I rent from SpaceX. It’s kinda awesome though.
Only house I own is the events house in the Bay Area. If I sold it, the house would see less use, unless bought by a big family, which might happen some day.
— Elon Musk (@elonmusk) June 9, 2021
काय आहेत या घराची वैशिष्ट्ये?
हे घर केवळ 375 स्क्वेअर फूट जागा व्यापतं. यामध्ये बाथरुम, लिव्हिंग रुम आणि बेडरुमची सोय आहे. किचन आणि बेडरुम हे कनेक्टेड आहेत. बाथरुम हे किचनला लागून असून त्यामध्ये बाथ टब, काऊंटर टॉप, सिंक, मिरर आणि स्लायडिंग डोअरची सोय आहे.
महत्वाचं म्हणजे हे घर जरी फोल्डेबल असलं तरी ते वादळ किंवा पूर तसेच इतर नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी मजबूत आहे. या नैसर्गिक आपत्तींचा त्याच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
महत्वाच्या बातम्या :
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Elon #Musk #इलन #मसक #यच #इनसटनट #घर #पहलय #क #छटयश #बकसमधय #रहतय #अबजधश