Friday, August 12, 2022
Home मुख्य बातम्या 'E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य'

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’


ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी

पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज गेल्या आठ तासांपासून ईडी चौकशी सुरु आहे. दुसरीकडे नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज आपत्ती व्यवस्थापक विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. तर गोव्यात ताज हॉटेलमध्ये शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. “E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमचे ED चे राज्य”, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं.

दीपक केसरकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला. तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देऊन पुन्हा मते घ्या, असं केसरकर म्हणाले. “E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आमचे ED चे राज्य. संजय राऊत यांचे रेकॉर्ड चांगले असेल तर त्यांना क्लीन चिट मिळेल. त्यांना शुभेच्छा”, असं दीपक केरसरकर म्हणाले.

(फडणवीस उपमुख्यमंत्री! मुंबई कार्यालय ते नागपूरपर्यंत भाजपच्या पोस्टर्सवरुन अमित शाहाच गायब!)

“बाळासाहेबांचं माझ्या कुटुंबातील सदस्य मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न नव्हतं. उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्री पद नको होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते दिलं. मात्र आम्ही आज शिवसैनिक मुख्यमंत्री केला”, असंदेखील केसरकर म्हणाले. तसेच “भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. त्यांच्यी माझी वैचारिक लढाई आहे”, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली.

‘आमदारांचा गोव्यातील जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली जातेय’

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवी मुख्यमंत्री असतील असं म्हणत मोठा राजकीय बॉम्ब फोडला. भाजपच्या हायकमांडने याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली. दरम्यान, एकनाथ शिंदे हे नवे मुख्यमंत्री होणार याबाबतची माहिती गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनादेखील नव्हती. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली तेव्हा त्यांनादेखील आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडीओ देखील समोर आला होता. पण या व्हिडीओवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. आमदारांच्या जल्लोषाचे व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली जातेय, असं दीपक केसरकर म्हणाले.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गोव्यात आमदारांनी जल्लोष केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी केली जात आहे. ती आमदारांचा तणाव कमी झाल्याने नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असं दीपक केसरकर म्हणाले. तसेच आता इथून पुढे कसे वागायचे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.

“सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हाव, अशी आमची इच्छा होती. पण होतील असं वाटत नव्हतं. शिंदेंनी मुख्यमंत्री होणं हा आमच्यासाठी सुखद धक्का होता. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केली. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मोठं मन दाखवलं”, असं दीपक केसरकर म्हणाले.

“जलयुक्त शिवारचे पुनर्जीवन फडणवीस यांनी केले. ओबीसी आरक्षणाबाबत सुद्धा ते प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्र्यांमुळे ग्रामीण आणि शहर जोडलेली. तुमच्या पैकी प्रत्येक जण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य आहे”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. एकनाथ शिंदेंना बुद्धिमान देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. काम करणाऱ्या माणसाला बुद्धिमान माणसाची साथ मिळत आहे, असंदेखील केसरकर यावेळी म्हणाले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#महणज #एकनथ #आण #महणज #दवदर #ह #आमच #च #रजय

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...