Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Door of Aliens House : मंगळ ग्रहावर दिसला एलियनच्या घराचा दरवाजा?

Door of Aliens House : मंगळ ग्रहावर दिसला एलियनच्या घराचा दरवाजा?


Door of Aliens House : अवकाशाच्या अनेक रहस्यं दडलेली आहेत. नासा (NASA) आणि अन्य अवकाश संशोधन करणाऱ्या संस्था आणि शास्त्रज्ञ दररोज काही ना काही नवीन शोध घेण्यासाठी संशोधन करत असतात. संशोधनामधून आतापर्यंत अनेक छुप्या रहस्यांची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकन अंतराळ संशोधन करणारी संस्था नासाला मंगळावर काहीतरी विचित्र आढळलं आहे. अलीकडेच नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावरील (MARS) दगडामध्ये चौकोनी मार्ग दिसला. हे पाहून तिथून कुठेतरी मार्ग असल्याचा अंदाज लावला जात आहे. मात्र, दगडात बनवलेल्या या दरवाजाच्या आत काय आहे, हे सध्यातरी कळू शकलेलं नाही.

हे फोटो पाहिल्यानंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले की मंगळाच्या मध्यभागी जाण्यासाठीचा मार्ग सापडला आहे. किंवा हा मार्ग एलियनच्या (Alien) घराचा दरवाजा देखील असू शकतो. तसेच, काही शास्त्रज्ञांचा असा अंदाज व्यक्त केला आहे की, मंगळावरील भूकंपामुळे दगड तुटल्याने हा एक आकार तयार झाला आहे किंवा हा आकार दगडांवर मंगळ ग्रहावर असणाऱ्या कोणत्या ना कोणत्या दबावाचा परिणाम आहे. मे महिन्याचा सुरुवातीलाच 4 मे 2022 रोजी मंगळ ग्रहावर सर्वात भयानक भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती.

 

नासाने शेअर केलेले फोटो पाहिल्यानंतर काही शास्त्रज्ञांनी असल्याचं म्हटलं आहे की, हा दगडाच्या मध्यभागी तयार केलेला खड्डा आहे. हा खड्डा लाल मातीने भरलेला आहे. मंगळावरील भूकंपामुळे दगडाचे तुकडे झाले आणि त्यामुळे दरवाजा दिसू लागला. हा दरवाजा जिथे सापडला त्याला शास्त्रज्ञांनी ग्रीनह्यू पेडिमेंट म्हटलं आहे.

या फोटोंचे वर्णन करताना नासाने सांगितले की, गेल्या काही वर्षांत मंगळावरील लँडर्स आणि रोव्हर्सनी अतिशय विचित्र आणि नेत्रदीपक फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. या फोटोंमध्ये मंगळावर बर्फाने भरलेले खड्डे, वेगवेगळ्या आकाराचे दगड, डोंगर आणि इतरही अनेक गोष्टी आढळल्या आहेत.

अंतराळात कोणतीही वेगळी किंवा विचित्र गोष्टी सापडली की त्यांच्या संबंध एलियन्ससोबत जोडला जातो. त्यामुळे मंडळावरील या घटनेला एलियन्ससोबत जो़डले जात आहे. पण, नासाने या फोटोंबाबत म्हटले आहे की, आपण अशा कथांपासून दूर राहिले पाहिजे. अधिक संशोधनात या संदर्भातील ठोस माहिती समोर येईल. तोपर्यंत अशा अफवांवर विश्वास ठेवणे आणि अफवा पसरवणं चुकीचं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Door #Aliens #House #मगळ #गरहवर #दसल #एलयनचय #घरच #दरवज

RELATED ARTICLES

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

Most Popular

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, हातात हात घेऊन दिली रोमँटिक पोज

मुंबई: फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar Birthday) याने २५ मे रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान बॉलिवूडच्या या बड्या फिल्ममेकरच्या वाढदिवसाची पार्टीही...

फक्त चवीसाठी नव्हे, कढीपत्त्याचे आरोग्यासाठी आहेत इतके फायदे; हाडांसाठी गुणकारी

नवी दिल्ली, 26 मे : कढीपत्ता (Curry leaves) हा सामान्यतः दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरला जातो. खाद्यपदार्थांना एक विशेष चव आणण्यासाठी त्याचा वापर...

अनिल परबांच्या घरावर EDची धाड, परबांच्या संबंधित सात मालमत्तांवर ईडीकडून छापा

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांवर ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...

IPL 2022 : रजतचं शतक राहुलवर भारी, लखनऊला धक्का, RCB फायनलच्या आणखी जवळ

कोलकाता, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022 Eliminator) एलिमिनेटरमध्ये आरसीबीने लखनऊ सुपर जाएंट्सना (RCB vs LSG) पराभवाचा धक्का दिला आहे, त्यामुळे...

काश्मीरच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर दहशतवाद्यांचा गोळीबार, अमरीन भटचा खून

श्रीनगर, 25 मे : काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची बातमी आज समोर आली. त्यानंतर काश्मीरमधील आणखी एक महत्त्वपूर्ण बातमी...