Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या Devendra Fadnavis : , उद्धव ठाकरेंविरोधात देवेंद्र फडणवीसांनी दंड थोपटले!

Devendra Fadnavis : , उद्धव ठाकरेंविरोधात देवेंद्र फडणवीसांनी दंड थोपटले!


मुंबई :  मुंबईतल्या बीकेसीत आज शिवसेनेची जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी  देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांचा समाचार घेतला. आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवरही शरसंधान साधलं. बाबरी पाडायला आपण उपस्थित होतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं, त्यावर ठाकरेंनी टीका केली. त्यावर आज फडणवीसांनी “जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा…” म्हणत पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत,  सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम…अरे छट हा तर निघाला…आणखी एक  ‘टोमणे बॉम्ब’… जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

 देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर  तुमच्या वजनाने बाबरी पडली असती  

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर  : चंद्रकांत पाटील 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई कमी करण्याची जबाबदारी विसरले. दाऊदच्या टोळीशी व्यवहार करणाऱ्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे, हे सुद्धा विसरले. त्यांना मुख्यमंत्रीपदाचाच विसर पडल्याचे दिसले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे : अतुल भातखळकर

उद्धव ठाकरेंनी खरोखर देशाचे नेतृत्व करावे, म्हणजे त्यांचे टोमणे ऐकण्याचे भाग्य देशवासियांना लाभेल. क्वचित प्रसंगी पुतीन आणि बायडन यांनाही टोमणे सुखाचा लाभ घेता येईल, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Uddhav Thackeray speech : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

Uddhav Thackeray: राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस; उद्धव ठाकरेंची टीका

भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Devendra #Fadnavis #उदधव #ठकरवरधत #दवदर #फडणवसन #दड #थपटल

RELATED ARTICLES

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Best 5G Phone: नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

Best 5G Phone 2022: गेल्या काही वर्षात भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक कंपन्या दरआठवड्याला नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत...

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Most Popular

भारतात 10 हजाराच्याही नोटा छापल्या जायच्या; उच्च मूल्याच्या नोटांचा इतिहास

नवी दिल्ली, 21 मे : चलनाचा वापर जगभरातील वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. जेव्हा चलन वापरले जात नव्हते, तेव्हा वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तूंचाच...

YouTube चं नवं अपडेट, युजर्सला Video पाहताना असा होणार फायदा

नवी दिल्ली, 21 मे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) आपल्या युजर्सच्या सुविधेसाठी वेळोवेळी नवे अपडेट जारी करत असतं. याचदरम्यान व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने...

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Rajya Sabha election: राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’, 26 मे रोजी भरणार अर्ज

मुंबई, २० मे -राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election 2022) राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे तर...

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

BMC Election 2022 : आपनं कंबर कसली; दिल्ली, पंजाबनंतर आता मुंबई जिंकण्यासाठी सज्ज

Mumbai Mahapalika Election 2022 : संपुर्ण देशाचं लक्ष लागलेलं शहर म्हणजे मुंबई (Mumbai) शहर. या मुंबई शहरात आगामी...