Saturday, November 27, 2021
Home विश्व Delta Variant ची दहशत! फक्त एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण New Zealand...

Delta Variant ची दहशत! फक्त एक कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण New Zealand Lockdown


वेलिंग्टन, 17 ऑगस्ट : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे (Delta plus) आतापर्यंत 76 रुग्ण सापडले आहेत. असं असलं कोरोनावर नियंत्रण पाहता काही प्रमाणात नियम शिथील करण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मात्र न्यूझीलँडमध्ये (New Zealand)  आता फक्त एक नवा कोरोना रुग्ण सापडला  (New Zealand Corona case) आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन (New Zealand Lockdown) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलँड हा तोच देश आहे, जिथं गेल्या वर्षी कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळवलं होतं. त्यानंतर या देशातील लॉकडाऊन उठवण्यात आला होता. पण आता याच देशात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या पहिल्या कम्युनिटी केसची नोंद झाली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.
ऑकलँडमध्ये कोरोना रुग्ण सापडला आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार आरोग्य महासंचालक अॅश्ले ब्लूमफिल्ड यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ऑकलँडमधील 58 वर्षांची व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. या व्यक्तीलने लस घेतलेली नाही. देशातील इतर भागात प्रवास केला होता. त्यामुळे सीमेशी याचा संबंध आहे.
हा अधिक संसर्गजन्य अशा डेल्टा कोरोनाचं प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण अद्याप याचं जीनोम सिक्वेंसिंग होतं आहे, त्यामुळे स्पष्ट झालेलं नाही.
हे वाचा – राज्यात Delta Plus चा धोका वाढत असताना आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
पण खबरदारी म्हणून न्यूझीलंडच्या पंतप्रधान (New Zealand’s Prime Minister) जेसिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात तीन दिवसांचा तर ऑकलँड आणि त्याच्या आजूपासूनच्या क्षेत्रात सात दिवसांसाठी लॉकडाऊन असेल. आज रात्रीपासूनच लॉकडाऊन लागू होणार आहे. वेलिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
लेव्हल चारचा हा लॉकडाऊन असेल. शाळा, सार्वजनिक ठिकाणं आणि ऑफिसही बंद राहतील. सुपरमार्केट, औषधांची दुकानं अशा अत्यावश्यक सेवाच सुरू असतील.  लोकांनी घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरज असल्यास घराबाहेर पडा आणि मास्कचा वापर करा असं आवाहन करण्यात आलं आहे.
हे वाचा – बापरे! ‘या’ देशात Corona च्या पाचव्या लाटेमुळे हाहाकार; दररोज 600 जणांचा मृत्यू
जेसिंडा अर्डर्न म्हणाल्या, “डेल्टा व्हेरिएंट असलेल्या देशांच्या यादीत आता शेवटी आहोत. इतर देशांकडून काय करायला आणि काय नाही हे आपण आता शिकण्याच्या स्थितीत आहोत. डेल्टाला गेमचेंजर म्हटलं जात आहे आणि तो आहे. याचा अर्थ आपल्याला पुन्हा संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची गरज आहे. इतर ठिकाणी काय होत आहे, ते आपण पाहत आहोत. जर आपण अयशस्वी झालो तर मग आपण टॉपवर जाऊन. आपल्याकडे फक्त एकच संधी आहे”अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Delta #Variant #च #दहशत #फकत #एक #करन #रगण #सपडतच #सपरण #Zealand #Lockdown

RELATED ARTICLES

Smartphone हरवल्यास Paytm Account असं करा डिलीट, पाहा सोपी प्रोसेस

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : Smartphone सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची, गरजेची गोष्ट झाला आहे. आता मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडीओच नाही, तर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, सोशल...

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

Arjun Khotkar : ईडीकडून खोतकरांच्या घराची तब्बल 18 तास झाडाझडती, आजदेखील छापेमारी होणार

Arjun Khotkar : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने ( सक्तवसुली संचालनायलय) शुक्रवारी...

Most Popular

Airtel चा बंपर धमाका, या ४ प्लान्स सोबत रोज मिळणार फ्री डेटा, जाणून घ्या सर्वकाही

हायलाइट्स:एअरटेल यूजर्संसाठी एक गुड न्यूज चार प्लानमध्ये मिळणार ५०० एमबी डेटा फ्री प्लानची किंमत आणि बेनिफिट्स पाहा नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या नेहमी यूजर्संना...

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

तुम्हाला हिवाळ्यात आल्याचा चहा प्यायला आवडतो का? मग या गोष्टीही माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : हिवाळ्यात (Winter) चहा पिणं कोणाला आवडत नाही? बाहेरची थंड हवा आणि हातात गरम चहाचा कप प्रत्येक माणसाचा मूड बदलतो....

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

IPL 2022 Mega Auction: कोण होणार नव्या अहमदाबाद टीमचा कर्णधार?

नव्या अहमदाबाद टीमच्या कर्णधारपदासाठी 5 नावं प्रामुख्याने समोर आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...