Saturday, August 13, 2022
Home भारत delhi rape : धक्कादायक! दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या,...

delhi rape : धक्कादायक! दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून हत्या, मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न


नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत एका ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या ( Nine Year Old Girl Allegedly Raped And Murdered ) करण्यात आली. एवढचं नव्हे तर नराधमांनी तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी एका पुजाऱ्यासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. तर स्थानिकांनी न्याय आंदोलन करत न्याय देण्याची मागणी केली आहे.

दिल्लीत कँन्टोन्मेंट भागातील पुराना नांगल भागात एका मागास कुटुंबातील ही पीडित मुलगी होती. तिचं कुटुंब एका स्मशानाजवळ रहातं. ती सोमवारी संध्याकाळी स्मशानात पाणी आणण्यासाठी गेली होती. पण परतलीच नाही. स्मशानात तिचा मृतदेह असल्याची माहिती काही स्थानिकांना मिळाली. ते लगेचच मुलीच्या आईला घेऊन स्मशानात गेले आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी असलेला तिचा मृतदेह दाखवला.

स्मशानातील कुलरमधून पाणी भरत असताना विजेचा धक्का बसल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं आधी सांगण्यात आलं. मुलीच्या हातावर चटके दिल्याची निशाणं दिसत होती. तिचे ओठही निळे पडले होते, असं तिच्या आईने सांगितलं. पुजारीने आमच्या म्हणण्याविरोधात मुलीवर अंत्यसंस्कार केले. मुलीचा मृत्यू विजेचा धक्का बसून झालेला नाही. तर पुजारीने तिच्यावर बलात्कार केला आहे, असा आरोप मुलीच्या आईने केला.

या घटने प्रकरणी पोलिसात तक्रार करू नका. पोलिस तक्रार केली तर मृतदेहाचं पोस्टमार्टम होईल. तिचे अवयव चोरूले जातील. यापेक्षा वेळ न घालवता लवकरात लवकर अंत्यसंस्कार केले पाहिजे, असं पुजारी राधेश्याम आणि त्याच्या साथीदारांनी मुलीच्या आईला सांगितलं. मुलीच्या पालकांना पैसे दिल्याची शंका स्थानिकांना आली.

‘पेटती चिता विझवून मृतदेह बाहेर काढला’

आमच्या समाजाच्या काही जणांनी जळत असलेली चिता विझवली. मुले पाय धरून मृतदेह बाहेर काढला. तिला न्याय मिळायला हवा. आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे, असं मुलीच्या आईने सांगितलं. तर एका व्यक्तीने आपल्याला मारहाण केली आणि पोलिसात तक्रार न करण्यासाठी धमकी दिली, असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं. घटनेवळी आपण बाजारात होतो. आपल्याला या घटनेबद्दल संध्याकाळी ७.३० वाजता कळलं. त्यावेळी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू होते. एका व्यक्ती आपल्याला मारहाण करत पोलिसात तक्रार न करण्यासाठी धमकावलं. तसंच २० हजार रुपये देऊ असंही ती व्यक्ती म्हणाल्याचं मुलीच्या वडिलांनी सांगितलं.

पण मुलीच्या आई-वडिलांनी हे प्रकरण पोलिसांत नेलं. जुन्या नांगल गावातील जवळपास २०० गावकरी स्मशानाजवळ एकत्र आले आणि त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. रात्री १०.३० च्या सुमारास आम्हाला फोन आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाल लैंगिक अत्याचार आणि मागासवर्गीय जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे, अशी माहिती साऊथ-वेस्ट जिल्हा पोलिसमधील वरिष्ठ अधिकारी प्रताप सिंह यांनी दिली.

CCTV फुटेज : मॉर्निंग वॉकला निघालेल्या न्यायाधीशाला टेम्पोची जाणून बुजून धडक

ACP पदावरील वरिष्ठ अधिकारी करणार चौकशी

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. एससी-एसटी अॅक्ट आणि पॉक्सो कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. एसीपी रँकच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणी चौकशी केली जाईल. सर्व आरोपींना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांनी मंगळवारी ट्वीट करून दिली.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#delhi #rape #धककदयक #दललत #९ #वरषचय #दलत #मलवर #बलतकर #करन #हतय #मतदह #जळणयचह #परयतन

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

महिलांची ‘आयपीएल’ पुढील वर्षी मार्चमध्ये?

पीटीआय, नवी दिल्ली : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिलांच्या स्वतंत्र इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) मार्च २०२३पासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. ही लीग...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...