Saturday, July 2, 2022
Home क्रीडा Cricketer Rashid Khan seeks help for the Afghanistan earthquake victims vkk 95

Cricketer Rashid Khan seeks help for the Afghanistan earthquake victims vkk 95२२ जून रोजी सकाळी अफगाणिस्तानातील अनेक भागांना भूकंपाचा जोरदार धक्का बसला. ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे अंदाजे एक हजार जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे दीड हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भुकंपाचा धक्का एवढा तीव्र होता की अफगाणिस्तान सोबत पाकिस्तान आणि भारतातील काही भागांनाही हा धक्का जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा दलांकडून बचाव कार्य राबवण्यात येत आहे. या मदतकार्याला हातभार लावण्यासाठी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान पुढे आला आहे. त्याने सोशल मीडियावर जगभरातील लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे.

अफगाणिस्तानील अनेक अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्यावेळी राशिद खानेने तेथील नागरिकांना मदत केली आहे. आतादेखील त्याने आपल्या ‘राशिद खान फाउंडेशन’च्या सहाय्याने भूकंपग्रस्तांसाठी मदत जमा करण्यास सुरुवात केली आहे. या भूकंपात सर्वस्व गमावलेल्या एका निरागस मुलीचा फोटो राशिद खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “ही छोटी मुलगी तिच्या कुटुंबातील एकमेव जिवंत सदस्य आहे. भूकंपानंतर या मुलीच्या कुटुंबातील एकही सदस्य सापडला नाही. भूकंपामुळे अनेक घरांची पडझड झाली असून दुर्गम भागात अजूनही लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. अशा परिस्थितीत मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की, शक्य ती मदत करा.”

अफगाणिस्तानात बुधवारी आलेला भूकंप हा दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली भूकंप होता. शेजारील देश पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पक्तिका प्रांतातील खोस्त शहराच्या दक्षिण-पश्चिमेस सुमारे ५० किमी अंतरावर होता. हा भाग डोंगळाल असल्याचे येथे मदत कार्यात अडथळे येत आहे. त्यामुळे राशिद खानने स्वत: पुढाकार घेत आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्याने एक व्हिडिओ संदेशही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

भूकंपग्रस्तांसाठी स्थानिक तालिबान सरकारने १ अब्ज अफगाणी रुपयांची (८७.५३ कोटी रुपये) मदत जाहीर केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त करत अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देऊ केली आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Cricketer #Rashid #Khan #seeks #Afghanistan #earthquake #victims #vkk

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Marathwada: मराठवाड्यात आतापर्यंत 137 मिलिमीटर पाऊस; गेल्यावर्षीच्या तुलनेत कमीच

Marathwada Rain Update: मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदर हजेरी लावली असून, मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी...

विराटचं चाललंय तरी काय, अशाप्रकारे बाद झाला की तुम्हीच कपाळाला हात लावाल

बर्मिंगहम, 1 जुलै : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या (Ind Vs Eng Test Match) कसोटीत ज्याप्रकारे बाद झाला त्यावरुन त्याच्यावर टीका केली...

Samsung ची भन्नाट ऑफर! ‘या’ यूजर्सला लॅपटॉप, स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन अथवा लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंगने शानदार ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीने Student Advantage Program...

फडणवीसांची ‘उपमुख्यमंत्री’ पदावरुन नाराजीच?फडणवीसांच्या सोशल मीडियावर कुठेही पदाचा उल्लेख नाही!

Maharashtra DCM Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची महाराष्ट्रातील राजकीय उलटफेरीत (Maharashtra) 'चाणक्य' अशी प्रतिमा...

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -  Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा...

Eknath Shinde : कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा...