Saturday, July 2, 2022
Home क्रीडा County Cricket : ‘या’ भारतीय खेळाडूसोबत लँकशायर क्लबने केला करार

County Cricket : ‘या’ भारतीय खेळाडूसोबत लँकशायर क्लबने केला करारइंग्लंडला क्रिकेटचे माहेरघर मानले जाते. ब्रिटिशांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत क्रिकेटचा प्रसार झाला. इंग्लंडमध्ये आजही पारंपरिक काऊंटी क्रिकेटला फार महत्त्व आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात जुना प्रकार अशी काऊंटीची ओळख आहे. काऊंटी क्रिकेट खेळणे ही आजही खेळाडूंसाठी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. आतापर्यंत काही भारतीय खेळाडूंनी देखील काऊंटी क्रिकेट खेळलेले आहे. त्यामध्ये आता लवकरच वॉशिंग्टन सुंदरचेही नाव समाविष्ट होणार आहे. लँकशायर क्रिकेट क्लबने आगामी ५० षटकांच्या चषकासाठी आणि काऊंटी चॅम्पियनशिपसाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध करण्याची घोषणा केली आहे.

लँकशायरने आपल्या ट्विटर अकाऊंच्या माध्यमातून सुंदरला करारबद्ध केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. “भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला करारबद्ध केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. युनायटेड किंग्डमचा व्हिसा मंजूर झाल्यानंतर वॉशिंग्टन क्लबमध्ये दाखल होईल. साधारण पुढील महिन्यात तो अमिरात ओल्ड ट्रॅफर्ड येथे त्याच्या नवीन सहकाऱ्यांना भेटेल,” असे ट्विट लँकशायर क्रिकेटने केले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये बोटाला दुखापत झाल्यानंतर सुंदर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांबच आहे. या दुखापतीमुळे तो गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यातून आणि २०२१मधील इंडियन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या टप्प्यापासून त्याला बाहेर पडावे लागले होते. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.

हेही वाचा – Ranji Trophy 2022 Final: सैन्याच्या शाळेत प्रशिक्षण घेऊन अंतिम सामन्यात पोहचला मध्य प्रदेशचा संघ! ‘या’ व्यक्तीला जाते श्रेय

लँकशायरमध्ये सामील झाल्यानंतर सुंदरने आनंद व्यक्त केला, काऊंटी क्रिकेटमधून खूप काही शिकायला मिळेल असे त्याचे म्हणणे आहे. तो म्हणाला, “लँकशायर क्रिकेटसोबत प्रथमच काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. इंग्लिश परिस्थितीत खेळणे हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव असेल. मी अमिराती ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळण्याची आतुरतेने वाट बघत आहे.” या संधीसाठी त्याने लँकशायर क्रिकेट आणि बीसीसीआय या दोघांचे आभार मानले आहेत.

लँकशायर सध्या काऊंटी चॅम्पियनशिप विभागातील गुणतालिकेत सरे आणि हॅम्पशायरच्या मागे तिसऱ्या स्थानावर आहे. व्हिटॅलिटी ब्लास्ट टी-२० सामन्यांनंतर ते २६ जूनपासून ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या लढतीसह रेड-बॉल क्रिकेट पुन्हा सुरू करतील.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#County #Cricket #य #भरतय #खळडसबत #लकशयर #कलबन #कल #करर

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

19 वर्षांपर्यंत मुलीला 5 वेळा विकलं, महाराष्ट्रासह येथील मुलींवर लागते बोली

सात वय वर्षाची एक मुलगी जिच्या वयाच्या मुली, खेळायच्या, मज्जा-मस्ती करायच्या, आपलं लहानपण भरभरुन जगायच्या. मात्र, आपलं आनंदी आयुष्य जगत असताना, ती दिल्लीला...

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : बुमराच्या नेतृत्वाची ‘कसोटी’!; इंग्लंडविरुद्धचा प्रलंबित पाचवा सामना आजपासून; रोहित मुकणार

पीटीआय, बर्मिगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील प्रलंबित पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होणार असून अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाहुण्या संघाच्या...

Photography Tips: लो लाइटमध्ये काढा प्रोफेशनल फोटो, ‘या’ टिप्स येतील खूपच उपयोगी

Photography Tips: सध्या बाजारात ६४ मेगापिक्सल, १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारे अनेक शानदार फोन्स उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या फोन्सला दमदार कॅमेऱ्यासह सादर करतात....

चाहत्यांसाठी चिंतेची बातमी! MS Dhoni या आजाराने त्रस्त

महेंद्रसिंह धोनी सध्या या आजारावर वैद्यांकडून उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

मुंबई अवघ्या काही तासांच्या पावसाने तुंबई, मुंबईसह उपनगरात तब्बल 256 मिमी पाऊस

मुंबई, 01 जुलै : मागच्या कित्येक दिवसांपासून राज्यात अनेक भागात पावसाने (Maharashtra monsoon rain) दडी मारली होती. दरम्यान मुंबई (Mumbai rain) आणि उपनगरातही पावसाची प्रतिक्षा...

राशिभविष्य : भाग्याची साथ, आर्थिक लाभ; जुलै महिन्याचा पहिला दिवस उत्तम जाणार

आज दिनांक 01 जुलै 2022. वार शुक्रवार. तिथी आषाढ शुक्ल द्वितीया. आज चंद्र कर्क राशीत भ्रमण करेल. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. पाहूया...