हायलाइट्स:
- कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचं कॉकटेल
- ‘ख्रिश्नच मेडिकल कॉलेज’मध्ये होणार अभ्यास
- ३०० जणांवर होणार चाचणी
करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील हा अशा पद्धतीचा अभ्यास पहिल्यांदाच केला जातोय. अमेरिका, युनायटेड किंगडम यांसहीत काही देशांत अशा प्रकारचा अभ्यास अगोदरपासूनच सुरू करण्यात आला आहे.
भारतात सध्या तामिळनाडूच्या ‘ख्रिश्नच मेडिकल कॉलेज’ला (CMC) या अभ्यासासाठी परवानगी देण्यात आलीय. ३०० स्वस्थ स्वयंसेवकांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा प्रत्येकी एक – एक डोस दिला जाईल.
ही चाचणी दोन गटांत घेण्यात येईल. पहिल्या गटाला अगोदर कोवॅक्सिन देण्यात येईल तर दुसऱ्या गटाला कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाईल. तर दुसरा डोस वेगळ्या लशीचा असेल.
कोविड १९ लसींवर अभ्यास करणाऱ्या काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दोन वेगवेगळ्या लसींचा एकत्रित वापर अधिक प्रभावकारक ठरल्याचं दिसून आलंय. वैद्यकीय दृष्टीकोनातून दोन लसींचा वापर केला जाऊ शकतो, मात्र यासाठी अधिक अभ्यासाची गरज ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी व्यक्त केली होती.
जागतिक आरोग्य संघटनेकडून दोन्ही डोससाठी एकाच लसीचा वापर करण्यात यावा, असा सल्ला आतापर्यंत दिला आहे. चुकून दुसरा डोस वेगळ्या लसीचा दिला गेला तर पहिल्या लसीचा अतिरिक्त डोस घेण्याची गरज नाही.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Corona #Vaccine #एक #डस #कवकसनच #तर #दसर #कवशलडच #अभयसल #परवनग