Monday, July 4, 2022
Home भारत Corona Cases in India : कोरोनाचा वेग पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांचा...

Corona Cases in India : कोरोनाचा वेग पुन्हा वाढला, सक्रिय रुग्णांचा आकडा 83 हजारांच्या पुढे


Corona Cases in India : भारतात कोरोना महामारीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,313 नवीन रुग्ण आढळले आहेत, 10,972 लोक या आजारातून बरे झाले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजारांहून अधिक (83,990 रूग्ण) वाढली आहे. यापूर्वी 22 जून रोजी देशभरात कोरोना संसर्गाची 12249 नवीन रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री घेणार बैठक

दुसरीकडे, कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने झालेली वाढ पाहता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना लगाम घालण्यावर चर्चा होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तज्ज्ञही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

 

 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय.

गेल्या काही दिवसातील कोरोना रुग्णांचा अहवाल पाहिला तर संसर्गाचा वेग वाढला आहे. अनेक तज्ज्ञ याला चौथी लाट देखील म्हणत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालात मंगळवारी बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. मात्र, बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून एकूण 12,249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी 13 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, या महामारीमुळे देशभरात मृतांची संख्या 5,24,941 वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Update : दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, बुधवारी 3260 नव्या रुग्णांची नोंद

Covid19 Updates : काळजी घ्या… धोका वाढतोय! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 82 हजारांपार

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Corona #Cases #India #करनच #वग #पनह #वढल #सकरय #रगणच #आकड #हजरचय #पढ

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...