Saturday, August 13, 2022
Home भारत Corona Cases: राज्यात आज 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार...

Corona Cases: राज्यात आज 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई : राज्यात आज 6005 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे. 

राज्यात आज कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74  हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे. 

देशात गेल्या 24 तासांत 30,549 कोरोनाबाधितांची नोंद

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,549 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 422 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. केरळमध्ये काल दिवसभरात 13,984 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, काल दिवसभरात देशभरातून 38,887 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात गेल्या सहा दिवसांपासून सलग 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Corona #Cases #रजयत #आज #नवन #करनबधत #रगणच #नद #तर #हजर #रगण #करनमकत

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

pankaja munde talk about mla from the other party in bus bai bus zee marathi programme nrp 97 | “माझ्या वडिलांनी मला…” आमदार फोडाफोडीच्या...

झी मराठीच्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता...

ट्विस्ट होणारा Moto Razr 2022 लाँच, Samsung Galaxy Z Flip 4 ला देणार टक्कर, पाहा किंमत

नवी दिल्ली: Moto Razr 2022 Price: Moto Razr 2022 कंपनीचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. नवीन Motorola स्मार्टफोन फ्लॅगशिप Snapdragon...

Nothing Phone 1 खरेदी करणाऱ्यांसोबत धोका ? फोनचे ब्राइटनेस लेव्हल दाव्यापेक्षा खूपच कमी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली:Nothing Phone 1 Display: लाँचपूर्वी हटके, युनिक फीचर्समुळे आणि लाँच नंतर हँडसेटमध्ये येत असलेल्या समस्यांमुळे Nothing ब्रँडचा पहिला फोन, Nothing Phone 1...

Ind vs Zim: लोकेश राहुल फिट, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची नव्यानं घोषणा

मुंबई, 11 ऑगस्ट: 18 ऑगस्टपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली होती. दुखापतीमुळे लोकेश राहुलच...

sonalee kulkarni talk about how kunal benodekar proposed her in latest wedding video | “तो अंगठी विसरला अन्…” सोनालीने सांगितला कुणालच्या फसलेल्या प्रपोज प्लानचा...

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट...