Saturday, May 21, 2022
Home भारत Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी...

Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी वाट


कोलकाता, 13 मे : कोरोनाची (Corona) साथ अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये या महामारीने (Coronavirus pandemic) आपले पाय पसरले आहेत. मात्र, त्याची तीव्रता बरीच कमी झाली आहे. दररोज 2-3 हजार कोविड प्रकरणे (daily covid cases in India) समोर येत आहेत. कोविडमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर दुसरीकडे अनेकांना रोजीरोटीही गमवावी लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागला. तथापि, बर्‍याच लोकांनी नोकरी जाणं (Jobs lost in covid) कमजोरी किंवा कठीण मानले नाही आणि हार न मानता त्याचा सामना केला. अशाच पद्धतीने नोकरी गेल्यानंतर एका महिलेने उबेरवर बाईक टॅक्सी (Indian woman started riding Uber bike after job lost in lockdown) सुरू केली. हे काम निवडल्याबद्दल तिचं कौतुक केलं जात आहे.

तसं पाहिलं तर रिक्षा/टॅक्सी चालवणं, ओला-उबेरवर रिक्षा, टॅक्सी आणि विशेषतः बाईकचं रजिस्ट्रेशन केलेले पुरुषच मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, या महिलेनं या व्यवसायात येत नवीन रस्त्यावर पाऊल टाकलं आहे.

woman lost job in covid lockdown start riding bike

(फोटो: LinkedIn/Ranabir Bhattacharyyaa)

लोक बहुतेक सोशल मीडिया साइट Linkedin वर नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी (motivational stories on Indians) असतात. रणबीर भट्टाचार्य नावाच्या लेखकानं अशाच एका महिलेविषयीची प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. रणबीर यांनी एका महिलेसोबत फोटो टाकला आणि सांगितलं की कोविडच्या काळात नोकरी गमावल्यानंतरही तिने कशी हार मानली नाही (Woman started riding uber bike to support family after job loss) आणि कुटुंब चालवलं.

हे वाचा – Air India ने बोर्डिंगसाठी दिला नकार; महिलेला विमानतळावरच आला पॅनिक अटॅक, Video

हार न मानणारा लढाऊ बाणा इतरांसाठीही प्रेरणादायक

रणबीर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं- “आज मी उबेर मोटोद्वारे शहरात जाण्यासाठी बाईक बुक केली, त्यामुळे माझी मौतुशी बसू (Moutushi Basu) नावाच्या महिलेशी भेट झाली. ती 30 वर्षांची आहे. ती कोलकात्यापासून काही अंतरावर असलेल्या बरुईपूरमध्ये राहते. लॉकडाऊनपूर्वी ती Panasonic कंपनीत काम करत होती. पण लाखो भारतीयांप्रमाणे तिलाही कोविडच्या काळात नोकरी गमवावी लागली. आज पाऊस पडत असतानाही तिने माझ्याकडे एक रुपयाही जादा मागितला नाही. जेव्हा मी तिला विचारलं की, पावसाळ्यात कोलकात्यातील रस्त्यावर दुचाकी चालवण्याचा त्याचा अनुभव कसा होता, तेव्हा तिने सांगितलं की घर चालवण्यासाठी पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नाही. देव तिला आशीर्वाद देवो.”

हे वाचा – ड्रग्सच्या अतिसेवनाने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांनीच पुरला मृतदेह आणि…

लोकांनी मदतीचा हात पुढे केला

ही प्रेरणादायी पोस्ट वाचल्यानंतर लोकांनी या महिलेचं केवळ कौतुकच केले नाही तर, या महिलेची सोशल मीडिया वापरकर्त्यांना ओळख करून देणाऱ्या रणबीरचंही कौतुक केले. आता लोक त्या महिलेला मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास तयार आहेत. अनेकांनी तिच्यासोबत प्रवासही केल्याचं सांगितलं. तर, अनेक लोक महिलेबद्दल अधिक माहिती विचारत आहेत जेणेकरून तिला मदत व्हावी आणि नोकरी मिळावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Corona #मधय #नकर #गल #हर #न #मनत #महलन #घर #चलवणयसठ #नवडल #वगळ #वट

RELATED ARTICLES

Pune NCP Protest: लाल महालात लावणीप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन ABP Majha

<p>पुण्यातील लाल महालात लावणीचं शुटिंग झाल्याचं समोर आल्यानंतर मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. या लावणी शुटिंगचा संभाजी ब्रिगेडने निषेध...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

Most Popular

Amazon Tablet: अवघ्या ५ हजार रुपये सुरुवाती किंमतीत Amazon चे शानदार टॅबलेट्स लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : Amazon Fire 7 Tablet Launched: Amazon ने आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीला कमी किंमतीत दमदार टॅबलेट्ससाठी ओळखले जाते....

Pune : लाल महालातील लावणीचा व्हिडीओ व्हायरल; संभाजी ब्रिगेडचा आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

Pune News : पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात (Lal Mahal) छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली,...

Parenting Tips | तुमच्या ‘या’ गोष्टींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

मुंबई : Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी...

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...