Sunday, January 16, 2022
Home विश्व Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…


जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रोन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात.

डेल्टा व्हेरिएंट देखील त्याच श्रेणीत ठेवण्यात आला होता. हा व्हेरिएंट आढळण्यापूर्वीच युरोपातल्या अनेक देशांमध्ये आणि ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह इतर प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत होती. रशियामध्ये या महामारीमुळे रेकॉर्ड ब्रेक लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर जगात घबराट पसरली आहे.

24 नोव्हेंबरला WHO ला पोहोचला रिपोर्ट

दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी WHO कडून B.1.1.529 व्हेरिएंटमधील संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. दरम्यान 9 नोव्हेंबर 2021 रोजी टेस्टसाठी आलेल्या सॅपलमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला.

WHOचे महासंचालक टेड्रोस अधनम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं की, नवीन कोविड-19 व्हेरिएंट ओमिक्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत, त्यापैकी काही चिंताजनक आहेत. त्यामुळे आपल्याला लसीबाबत जागरुक असायला हवे.

हेही वाचा-  दक्षिण आफ्रिकेत COVID-19 चा आढळला नवा व्हेरिएंट, भारत सरकारनं जारी केले निर्देश

 SARS-COV-2 वर काम करणार्‍या तांत्रिक सल्लागार गटाची आज बैठक झाली आणि नवीन व्हेरिएंटवर चर्चा केली आणि WHO ला त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणण्याचा सल्ला दिला. यानंतर WHO ने त्याचे नाव Omicron ठेवलं.

व्हेरिएंट ऑफ कंसर्नचा अर्थ

देशांनी जीनोम अनुक्रम शेअर केले पाहिजेत

केसेस WHO ला कळवाव्या लागतील

परिणाम समजून घेण्यासाठी तपास करावा लागेल जेणेकरून त्याचे धोके आणि सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन योग्य व्यवस्था करता येईल.

हेही वाचा-  Corona: डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे हा नवा कोरोना स्ट्रेन; भारतात आहेत का रुग्ण?

 सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी येथे डेल्टा प्रकाराचा प्रादुर्भाव झाला होता. हा प्रकार बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये आढळून आला आहे. इस्रायलमध्ये मलावीहून आलेल्या एका व्यक्तीला याची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीला अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोसही देण्यात आले होते. गंभीर परिस्थिती लक्षात घेता, इतर अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचा शिरकाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

Published by:Pooja Vichare

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Corona #चय #नवय #सटरनल #न #दल #नव #महणल

RELATED ARTICLES

WhatsApp वर असा मेसेज आला तर सावध व्हा, हॅकर्सकडून होऊ शकते मोठी फसवणूक

नवी दिल्ली, 16 जानेवारी : तुम्हीही WhatsApp चा वापर करत असाल, तर सतर्क राहण्याची गरज आहे. हॅकर्स WhatsApp द्वारे कोणत्याही युजरची फसवणूक करू...

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Most Popular

विराट कोहलीच्या निर्णयानंतर रोहित शर्मा Shocked, म्हणाला….

मुंबई, 16 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) टेस्ट टीमच्या कॅप्टनपदाचा शनिवारी राजीनामा दिला. त्याने हे पद सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून...

covid vaccine : धक्कादायक! देशातील करोनावरील लसीकरण मोहीमेला १ वर्ष पूर्ण, पण…

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २ लाखांवर आढळून येत...

Tonga Tsunami : 30 वर्षातील सर्वात मोठा ज्वालामुखीचा स्फोट; जपानला त्सुनामीचा तडाखा!

टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टी, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. (Photo : PTI) अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

पुन्हा एकदा नवं काही…

|| गायत्री हसबनीस समांतर धाटणीचे हिंदी चित्रपट करणारी अभिनेत्री शेफाली शहा इतर अभिनेत्रींपेक्षा काहीशी वेगळी आहे, अशी धारणा समीक्षकांसह इंडस्ट्रीत आहे. अनेक हिंदी मालिका,...

“कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की BBCIमधील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण..”; उर्जा मंत्र्यांची प्रतिक्रिया

मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यावर...

सिंधूचे आव्हान संपुष्टात

पुरुषांमध्ये लक्ष्य एकेरीच्या, सात्त्विक-चिराग दुहेरीच्या अंतिम फेरीत वृत्तसंस्था, नवी दिल्ली दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या भारताच्या अग्रमानांकित पी. व्ही. सिंधूचे इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत...