Monday, July 4, 2022
Home भारत constitutional amendment bill : घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर, आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवणार

constitutional amendment bill : घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर, आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवणार


नवी दिल्लीः संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. लोकसभेत हे विधेयक मंगळवारी मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत बहुमताने हे विधेयक मंजूर ( parliament passes constitutional amendment bill ) करण्यात आलं. तसंच लोकसभेप्रमाणे राज्यसभेतही या विधेयकाविरोधात एकही मत पडलं नाही. राज्यसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. यानंतर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी सरकारची भूमिका मांडली. या विधेयकाला ज्या प्रकारे सर्वांनी पाठिंबा दिला आहे, यामुळे हा एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे. ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेवर चर्चा व्हायला हवी आहे. खासकरून या मर्यादेला ३० वर्षे उलटून गेली आहेत, असं ते म्हणाले.

१२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकामुळे अनुच्छेद ३४२ अ च्या कलम १ आणि २ मध्ये सुधारणा केली जाईल आणि नवीन खंड ३ चा यात समावेश केला जाईल. याशिवाय घटनेच्या अनुच्छेद ३६६ (२६ क) आणि ३३८ ब (९) मध्येही दुरुस्ती केली जाईल. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास असलेल्या (SEBC) समाजांची ‘राज्य सूची’ बनवण्यासाठी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश स्वतंत्र असतील, म्हणजेच मागास समाजांना त्यांना आरक्षण देता येईल.

sanjay raut : ‘आरक्षणासाठी लढणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला भीक नको, अधिकार हवे आहेत’

Parliament Session: लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित, तर राज्यसभेत सभा

‘देर आए लेकिन दुरुस्त आए’ असा टोला काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी या विधेयकावरील चर्चेवेळी सरकारला लगावला. पण या घटनादुरुस्ती विधेयकात ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेबाबत एका शब्दाचाही उल्लेख नाहीए. पण ही मर्यादा वाढवणं गरजेचं आहे. ७५ ते ८० टक्के राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी ५० टक्के मर्यादेचं उल्लंघन केलं आहे. केंद्र सरकार या विधेयकाद्वारे राज्यांना एक कागदपत्र देऊन आपली पाठ थोपटून घेत आहे, अशी टीका अभिषेक मनु सिंघवी यांनी केलीय.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#constitutional #amendment #bill #घटनदरसत #वधयक #रजयसभतह #मजर #आत #रषटरपतचय #सवकषरसठ #पठवणर

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

वय वर्ष फक्त 5; तिने केला हा कारनामा अन् इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली नोंद

इंदूर, 3 जुलै : वयाच्या 5 व्या वर्षी मुलं शिक्षणाची (Education) पहिली पायरी व्यवस्थित चढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, इंदूरची कन्या वन्या मिश्राने (Vanya...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

दैनंदिन राशीभविष्य: आठवड्याचा पहिला दिवस ‘या’ राशींसाठी असेल खास; असा जाईल दिवस

आज दिनांक ४ जुलै २०२२. वार सोमवार. तिथी आषाढ शुक्ल पंचमी. आज चंद्राचे भ्रमण दिवसभर सिंह राशीतून होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष वैवाहिक...

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...