‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या कोणत्याही पोस्टर, टीझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते. त्याची ही सामाजिक नेत्याची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावत असून सोशल मीडियावर प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतूनही त्याच्यावर कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदिनाथ कोठारे आपल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधील व्यक्तिरेखेविषयी म्हणतो, ”सिटी ऑफ ड्रीम्स’ मधील महेश आरवलेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक गुपित होते. हे गुपित प्रेक्षकांना आवडत आहे याचा आनंद नक्कीच आहे. अनेकांचे अभिनंदनाचे फोन, मेसेज येत असून सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे एक प्रकारची ऊर्जा मिळते तसेच अजून उत्तम काम करण्याचा हुरूप येतो.’
आदिनाथ आपल्याला ‘८३’, ‘पाणी’, ‘पंचक’ यांसारख्या आगामी चित्रपटांमधून दिसणार आहे. ‘८३’ हा १९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, दिपीका पदुकोण यांचासोबत आदिनाथही झळकणार आहे. माधुरी दीक्षित निर्मिती ‘पंचक’ या चित्रपटातही आदिनाथ कोठारे दिसणार असून माधुरी सोबतचा त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. आदिनाथ दिग्दर्शित ‘पाणी’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
चिन्याचे वडिलदेखील आहे सिनेसृष्टीत…वाचा अर्णव राजेबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#City #Dreams #आदनथ #कठरचय #वयकतरखचय #परमत #चहत #तमह #पहल #क #सरज