Saturday, May 21, 2022
Home करमणूक Chhava The Great Warrior : 'छावा-द ग्रेट वॉरिअर' सिनेमा लवकरच प्रदर्शित

Chhava The Great Warrior : ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ सिनेमा लवकरच प्रदर्शित


Chhava The Great Warrior : धर्मवीर संभाजी महाराजांच्या जयंती दिनीच्या पूर्वसंधेला त्यांच्यावरील चरित्रपट ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ (Chhava The Great Warrior) या सिनेमाची घोषणा झाली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ ग्रंथावर आधारित हा सिनेमा आहे. 

राहुल जाधव यांनी ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जाधव म्हणाले, भूराजे खरे ‘युथ आयकॉन’ आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्धकौशल्यावरच नाही तर चौदा भाषांवर आणि साहित्यावरदेखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपरहिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. ती ‘छावा-द ग्रेट वॉरिअर’ या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. 

थोर इतिहासकार आणि कादंबरीकार लेखक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले,”असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांच्या छावा.  आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती हा सिनेमा पाहिल्यावर येईल, असा मला विश्वास आहे”. 

सिनेमाचे निर्माते सनी रजानी म्हणाले,”जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला, सर्वात पहिली जैविक लढाई शंभूराजांनी बुद्धीने लढली. मोगलांना वाकवणारा, इंग्रजांना नाचवणारा, पोर्तुगीजांना झुकवणारा, सीद्दीला दर्यात बुडवणारा, एकाही लढाईत न हरलेला शेवटच्या श्वासापर्यंत अजेय ठरलेला शंभुराजांसारखा छत्रपती स्वराज्याला लाभला हे आपलं भाग्य. आणि त्यांच्या संघर्षमयी आणि गतीमान आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याचं भाग्य आम्हांला मिळालं आहे.”

संभाजी महाराजांच्या तेजस्वी कारकिर्दीवरील मल्हार पिक्चर्स प्रस्तुत ‘छावा-द ग्रेट वॉरियर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टर रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Chhava #Great #Warrior #छवद #गरट #वरअर #सनम #लवकरच #परदरशत

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

Most Popular

खूनी नाल्याजवळ बचाव मोहिमेदरम्यान दरड कोसळली; थरकाप उडवणार व्हिडीओ

श्रीनगर, 20 मे : रामबन जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका बांधकामाधीन बोगद्याच्या जागेवर ताज्या भूस्खलनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. जवळच्या डोंगराचा एक भाग...

असे झाले अंकुशचे शाहीर साबळे, दिग्दर्शकाने शेअर केला Making Video

मुंबई : दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शाहीर सिनेमाची घोषणा केली. शाहीर साबळेंवरच्या या सिनेमात शाहिरांची भूमिका करतोय अंकुश चौधरी....

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन...

Todays Headline 21st May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं...

कोरोनानंतर भारतावर आता Monkeypox चा धोका; मार्गदर्शक सूचना जाहीर

मुंबई : काही देशांमध्ये नवा संसर्ग मंकीपॉक्सचं प्रमाण वाढताना दिसतंय. यानंतर आता भारतातही खबरदारीचे उपाय सुरू झाले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीवर बारकाईने लक्ष...