Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल Celebrity Exercise Tips : ५०शी ओलांडल्यानंतरही सुपरहॉट अभिनेत्रीने मिळवली टोंड फिगर, वर्कआउट...

Celebrity Exercise Tips : ५०शी ओलांडल्यानंतरही सुपरहॉट अभिनेत्रीने मिळवली टोंड फिगर, वर्कआउट करतानाचा व्हिडिओ पाहून म्हणाल…


चंदेरी दुनियेतील नट्यांच्या सडपातळ बांध्याकडे पाहून त्या फिटनेससाठी काय करत असतील? असा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतो. बी-टाउनमधील बऱ्याच अभिनेत्री तर सोशल मीडिया अकाउंटवरुन वर्कआउट करतानाचा व्हिडिओ शेअर करत असतात. अशाच एका अभिनेत्रीचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. ही अभिनेत्री म्हणजे अनिता राज. ऐंशीच्या दशकामध्ये अनिता यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस तर क्या बात…

वयाच्या ५८व्या वर्षी देखील त्या अगदी फिट आहेत. पण तुम्हाला माहित आहे का त्या फिटनेससाठी चक्क या वयातही वेट लिफ्टिंग करतात. यादरम्यानचे त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरही अनिता यांनी शेअर केले आहे. त्यांचा फिटनेस पाहून वयाचा अंदाज लावणंही अशक्य होऊन जातं. अनिता यांचा फिटनेस पाहून आजही सगळ्यांच्या नजरा त्याच्यांवरच खिळून राहतात. फिटनेससाठी अनिता नेमकं काय करतात हे या लेखाच्या आधारे जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम@anitaraaj)

​नियमति वर्कआउट

वाढत्या वयामध्ये फिट कसं राहता येईल? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. मात्र अशा लोकांसाठी अनिता आदर्श बनल्या आहेत. वयाची ५५ वर्ष उलटून गेली असली तरी अनिता नियमित वर्कआउट करतात. फिट राहण्यासाठी त्या विविध व्यायामप्रकार करणं पसंत करतात. नियमित वर्कआउटबरोबर त्या हेवी वेट ट्रेनिंगही करतात. अनिता म्हणतात, वयाच्या ५८व्या वर्षी देखील वेट ट्रेनिंगबरोबर स्ट्रेन्थ ट्रेनिंग देखील माझ्या रुटीनचा एक भाग झाला आहे. तसेच कोणत्याही कारणामुळे वर्कआउट करणं शक्य नसेल तर स्विमिंग किंवा ब्रिस्क वॉकिंग करा. तसेच पुरेशी झोप घ्या.

(Weight Loss : ‘हा’ पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाची वाढलेली चरबी झटपट होईल कमी, ७ आयुर्वेदिक उपाय ठरतील रामबाण)

फिटनेससाठी अनिता काय करतात?

फिटनेस सीक्रेट

आपल्या फिटनेसबाबत अनिता सांगतात, आठवड्यातून तीन दिवस मी कार्डिओ करते. तसेच इतर दिवशी वेट ट्रेनिंग, स्ट्रेन्थ ट्रेनिंग आणि इतर व्यायाम प्रकार मी करते. यामुळे मला फिट राहण्यास मदत मिळते. २५ वर्षांपूर्वी जेव्हा मी वेट ट्रेनिंग करणं सुरु केलं तेव्हा हे फक्त पुरुषांसाठीच आहे असं मला वाटत होतं. पण हा गैरसमज माझ्या मनातून दूर झाला या गोष्टीचा मला आनंद आहे. महिलांसाठी देखील वेट ट्रेनिंग उत्तम ठरू शकते. यामुळे महिलांचे स्नायु बळकट होण्यास तसेच फिट राहण्यास मदत मिळते. जर महिलांनी वयाच्यी ३५शी ओलांडली असली तरी तुम्ही लाइट वेटपासून वर्कआउटला सुरुवात करू शकता.

(Celebs Diet : ‘या’ ३ पदार्थांपासून लांब राहत कतरिना कैफने मिळवली टोंड फिगर, ग्लॅम डॉलचा थक्क करणारा वर्कआउट व्हिडिओ एकदा पाहाच)

७२ किलो वजन उचलताना अभिनेत्री

डोकं शांत असणं गरजेचं

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. व्यस्त वेळापत्रकामधून बहुतांश लोकांना स्वतःसाठी वेळ काढणं शक्य होत नाही. पण तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनिता सांगतात, शारीरिक आरोग्याबरोबरच तुमचं मन देखील तितकंच शांत असणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही जर तुमचं डोकं शांत ठेवलं तर शरीर देखील निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. मन शांत राहण्यासाठी अनिता सकाळी ५.३० वाजता उठतात. आणि जप करतात. तसेच त्यानंतर काही वेळ जिममध्ये घालवतात.

(Weight Loss Story : मांसाहारी पदार्थ सोडून महिलेने घटवलं तब्बल २५ Kg वजन, लठ्ठपणामुळे हिणवायचे लोक)

टोंड फिगर आणि ग्लॅमरस लुक

डाएट नेमकं काय?

अनिता त्यांच्या डाएटकडे देखील विशेष लक्ष देतात. जेवढं आपण वर्कआउट करताना लक्ष देतो तितकंच लक्ष आपण आपल्या आहाराकडे देखील दिलं पाहिजे असं अनिता यांचं म्हणणं आहे. तुम्ही जर योग्य खाद्यपदार्थांचे सेवन करत असाल तर वजन वाढणार नाही. अनिता यांच्या डाएटमध्ये बाजरी आणि ज्वारीच्या भाकरीचा समावेश असतो. दुपारी त्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करणं पूर्णपणे टाळतात. तसेच संध्याकाळी पांढरं अंड, ड्राय फ्रुट्सचे सेवन करतात. तसेच उकळलेल्या भाज्या त्या कधीच खात नाही. फिट राहण्यासाठी उकळलेल्या भाज्या खाणं गरजेचं आहे हे त्यांना पटत नाही. अनिता फक्त बाहेरील खाद्य पदार्थांपासून लांब राहतात.

(Blood Pressure : घरबसल्या रक्तदाब कसा आणि कधी तपासावा? बीपी तपासताना ‘या’ गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या)

स्ट्रेन्थ ट्रेनिंग

​जिमला जाण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ टिप्स

जिमला जाण्यापूर्वी काही टिप्स फॉलो करण्याचा सल्ला अनिता देतात. त्या सांगतात, जिमला जाण्यापूर्वी शारीरिकरित्या तयार राहा. इतरांची नकल करणं टाळा. तसेच जिमला जाण्यापूर्वी काय खात आहात याकडे लक्ष द्या. ट्रेनिंगदरम्यान सावधान राहा. वाढत्या वयामध्ये देखील हार मानायची नाही हा अनिता यांचा स्वभाव खरंच कौतुकास्पद आहे. त्यांचा फिटनेस आज तरुण अभिनेत्रींना लाजवेल असाच आहे. आपल्या मिळालेल्या निरोगी शरीराचा सन्मान करा हे अनिता नेहमी सांगतात.

(Food Habits : जेवल्यानंतर अधिक झोप का येते? यामागील कारणं वाचून व्हाल हैराण, नेमकं सत्य काय?)

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Celebrity #Exercise #Tips #५०श #ओलडलयनतरह #सपरहट #अभनतरन #मळवल #टड #फगर #वरकआउट #करतनच #वहडओ #पहन #महणल

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्समध्ये वाटले गेले तब्बल 1.5 लाख Condoms, पण का?

कॉमनवेल्थच्या आयोजकांनी 12 दिवसांत 1.5 लाख कंडोमचं वाटप केलं होतं. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट  

Maharashtra Rain Live Updates : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या पावसामुळं काही...

‘हा’ पिटुकला प्रिंटर आहे खूपच कामाचा, घरीच प्रिंट करू शकता स्वतःचे फोटो; किंमत खूपच कमी

नवी दिल्ली: वेगवेगळ्या कामांसाठी आपल्याला कागदपत्रं प्रिंट करावी लागतात. अगदी कॉलेजची मार्कशीट असो अथवा छोट्या नोट्स बनवायच्या असतील, आपण दुकानात जाऊन प्रिंट काढतो....

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

गर्भातील बाळाची पोझिशन कशी ओळखाल? त्याचा प्रसूतीवर परिणाम होतो का?

Know Baby Position : बेबी मॅपिंग म्हणजे काय? हे आधी आपण जाणून घेऊया. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहीत बाळाची पोझिशन जाणून घेण्यासाठी बेली मॅपिंग केलं...