Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल Celeb Skin Care : बॉलीवूडमधील ही शालीन अभिनेत्री अनेक हॉट व बोल्ड...

Celeb Skin Care : बॉलीवूडमधील ही शालीन अभिनेत्री अनेक हॉट व बोल्ड अभिनेत्रींना देतीये तगडी टक्कर, रूप असं की व्हाल घायाळ!


अमृता राव (amrita rao) आणि शाहीद कपूर (shahid Kapoor) यांचा ‘विवाह’ हा बॉलीवूड मधील असा चित्रपट आहे जी प्रत्येक पिढीसाठी रिलेटेबल ठरेल, त्यामुळे एक प्रकारे अजरामर चित्रपट म्हणूनच या विवाहची नोंद झाली आहे. आज सुद्धा हा चित्रपट लागला की लोक तो पाहिल्याशिवाय राहत नाही. यात शाहीदचा लुक जरी क्युट असला तरी अमृता सुद्धा कमी भाव खाऊन गेलेली नाही. तिचा साधा सरळ पण मनाला भावणारा लुक एवढा प्रेक्षकांना आवडला की तिचे भले मोठे पोस्टर्स लोकांनी आपल्या घरात लावून घेतले होते. त्या चित्रपटाच्या रिलीज नंतर ती अगदी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली होती. (Amrita Rao Skin Care)

आज त्या चित्रपटाला खूप वर्षे होऊन गेली असली तरी आजही अमृता तितकीच सुंदर आणि सालस दिसते. अमृता आज चित्रपटांपासून दूर असेलही पण तिचं सौंदर्य आजही अतुलनीय आहे. अमृताने तिच्या सौंदर्यातील आणि त्वचेतील निरागसता जपली आहे. अमृताची ब्युटी सिक्रेट्स प्रत्येक मुलीसाठी अतिशय प्रभावी सिद्ध होतील ज्यांची त्वचा अतिशय मऊ आणि संवेदनशील आहे.पण काय आहेत तिच्या या अप्सरेसम टिप्स? (Amrita Rao Hair Care)

त्वचेची स्वच्छता

अमृता आपल्या स्कीनला क्लीन करण्यासाठी पूर्ण वेळ देते. ती कितीही थकलेली असो वा कितीही बिझी असो ती याबाबतीत अजिबात तडजोड करत नाही. जेव्हा स्कीन केअर करण्याची गोष्ट येते तेव्हा अमृताचा थकवा एक प्रकारे पळूनच जातो. तिची त्वचा क्लीन करण्याची पद्धत सुद्धा खास आहे. ती सर्वात आधी क्लींजिंग मिल्क आणि कॉटन पॅडने स्कीन साफ करते. त्यांनतर फेसवॉश करते. कॅलामाईल लोशन लावते आणि त्यानंतर शेवटी ती मेडिकेटेड मॉइश्चराइज लावते. या पद्धतीमुळे त्वचेला खूप फायदा मिळतो असे अमृता राव स्वत:च्या अनुभवातून सांगते.

(वाचा :- Flower Skin Care : मादकतेची व्याख्याच बदलली या जगप्रसिद्ध ट्रेजिडी क्वीनने, रात्री झोपण्यापूर्वी न चुकता करायची ‘हे’ काम, ऐकून व्हाल हैराण!)

पुन्हा हे रूटीन फॉलो करते

आपल्या त्वचेच्या स्वच्छतेचे हे रुटीन अमृता सकाळी पुन्हा उठून करते. तिचे म्हणणे आहे की या रूटीन मुळे त्वचा नेहमी फ्रेश आणि हेल्दी राहते. अमृताला आपल्या चेहऱ्यावर हेवीनेस पसंद नाही. म्हणून मेकअप करताना ती तो नेहमी लाईट ठेवते. जेणेकरून स्कीनची फ्रेशनेस आणि सालसपणा टिकून राहील. ती सांगते की ती लिपस्टिक, आयलाईनर, पावडर आणि ब्लश एवढ्याच गोष्टींचा उपयोग मेकअप मध्ये करते. कारण या गोष्टींच्या मर्यादित वापरानेच तिचा चेहरा दिवसभर ग्लोइंग आणि ताजातवाना दिसतो.

(वाचा :- Skin Care : ‘या’ गंभीर चूका ठरतात पिंपल्स व काळ्या डागांसाठी कारणीभूत, चेह-याची वाईट अवस्था होण्याआधीच सुरु करा ‘हे’ 8 उपाय!)

लांब आणि सिल्की केस

विवाह मध्ये अमृताचा जो लुक होता तो अगदी सामान्य स्त्रीला रिलेट करणारा होता. साडी आणि त्यावर बांधलेल्या तिच्या केसांची स्टाईल मध्ये ती इतकी गोड दिसत होती की आजची तिचा तो लुक विसरता येत नाही. टिपिकल इंडियन मिडल क्लास मुलीचे रूप तिने उत्तम रेखाटले होते. तेव्हा तिच्या सुंदर आणि लांबसडक केसांचे रहस्य जाणून घेण्याची सर्वांची इच्छा होती. तर त्यावर बोलताना अमृता म्हणाली की प्रत्येक वेळी शॅम्पू करण्याआधी मी माझ्या केसांना तेल नक्की लावते. खास करून ज्या दिवशी सकाळी तुम्ही शॅम्पू करणार आहात त्याच्या एक दिवस रात्रभर केसांना तेल लावून ठेवावे. यामुळे शाईन वाढते आणि केस सुद्धा खूप लांब आणि घनदाट होतात.

(वाचा :- या अभिनेत्रीच्या मादकतेची चौफेर चर्चा, बोल्ड लुक अन् मनमोहक सौंदर्यापुढे करीना-ऐश्वर्या देखील पडल्या फिक्या!)

हे रोज करू नका

अमृता म्हणते की केसांना शाईनी आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी दर दिवशी शॅम्पू करण्याची चूक अजिबात करू नका. पण ही गोष्ट तुमच्या केसांच्या कंडीशनर वर सुद्धा अवलंबून आहे. मी शॅम्पू केल्यावर केसांना हेअर मास्क लावते आणि मागे त्यांना कंडीशनरने केअर देते. यामुळे माझे केस खूप हेल्दी राहतात. तर मंडळी केसांची काळजी घेताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आणि आपल्या केसांच्या हेल्दीपणासाठी अवश्य फॉलो करा.

(वाचा :- बापरे.. ऐश्वर्या अन् माधुरीसारख्या टॉप अभिनेत्रींनाही टाकलं मागे, घायाळ करणारे सुपरहॉट लुक बघून म्हणाल ‘ही ती नव्हेच..!’)

अजून काही खास टिप्स

अमृता म्हणते की तुम्हाला नैसर्गिकपणे सुंदर दिसायचे असेल तर तुमच्या त्वचेला मोकळा श्वास घेऊ द्या. मी सुद्धा माझ्या त्वचेला शकत तितके फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करते. आता अमृताने बॉलीवूड मध्ये काम करणे तसे सोडलेलेच आहे. ती आता संसारात रमली आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात ती आपल्या बाळाला स्तनपान करत होती. या फोटोत सुद्धा आज वय झालेले असताना देखील तिच्या स्कीन वरचा ग्लो सगळ्यांचे लक्ष खेचून घेत होता. याला कारण हेच आहे की शक्य तितक्या आपल्या त्वचेची आजही काळजी घेते आणि त्यामुळेच तिचे सौंदर्य टिकून आहे.

(वाचा :- कोणीच लावू शकणार नाही तुमच्या ख-या वयाचा अंदाज, सदा चिरतरुण राहण्यासाठी वरदान आहे ‘हे’ खास मीठ!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Celeb #Skin #Care #बलवडमधल #ह #शलन #अभनतर #अनक #हट #व #बलड #अभनतरन #दतय #तगड #टककर #रप #अस #क #वहल #घयळ

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात समोर येणारांचा विषय तिथं बघू : परब

ST Strike : कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...