Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा


नवी दिल्ली, 15 जानेवारी : गाडी चालवणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने अतिशय महत्त्वाचं पाऊल उचलल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे फोर व्हीलर अपघातात लोकांचे मृत्यू कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या चारचाकी वाहनांमध्ये 8 लोकांच्या बसण्याची क्षमता असते, त्या गाड्यांमध्ये 6 एयरबॅग्स अनिवार्य रुपात लावण्याची तरतूद केली जात आहे. यासंदर्भातील अधिसूचनेचा मसुदा मंजूर करण्यात आला आहे.

नितीन गडकरी यांनी सांगितलं, की यापैकी 2 Torso एयरबॅग्स (Airbags) असतील. तर 2 Tube एयरबॅग्स असतील. या निर्णयानंतर भारतात मोटर व्हिकल सेफ्टीमध्ये मोठ्या सुधारणा होतील आणि अपघातात लोकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत होईल.

हे वाचा – 30 हजारात फोर्ड! सांगलीकराने बनवली जुगाड Ford,रिक्षाप्रमाणे हँडल मारुन होते सुरू

सध्या केवळ महागड्या गाड्यांमध्येच Airbags ची सुविधा मिळते. सामान्य कार्समध्ये कंपन्या ही सुविधा देत नाही. बजेट कार्समध्ये Airbags लावल्याने त्याची किंमत वाढू शकते, असा कंपन्यांचा तर्क आहे. याचा त्यांच्या विक्रीवरही परिणाम होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचा – नवी बजेट Car घेताय?देशात महाराष्ट्रामध्ये Electric Car वर मिळतेय सर्वाधिक सबसिडी

परंतु आता नितीन गडकरी यांनी Airbags ची सुविधा सर्व ब्रँड्सच्या कार्समध्ये उपलब्ध होईल असं म्हटलं आहे. कोणतीही कंपनी कारची किंमत, वेरिएंट किंवा सेगमेंटच्या आधारे यात कपात करू शकत नाही. एखाद्या Fortuner कारमध्ये 6 एयरबॅग्स असतील, तर मारुति कारच्या 8 सीटर कार्समध्येही इतकेच एयरबॅग्स असतील. Airbags च्या सुविधेमुळे अपघात झाल्यास, लोकांचा गंभीर दुखापतीपासून बचाव होईल, तसंच त्यांच्या जीवालाही कमी धोका असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#Car #परवस #हणर #सरकषत #Road #Safety #बबत #सरकरच #मठ #घषण

RELATED ARTICLES

‘हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार’, संयमी एकनाथ शिंदे भडकले

मुंबई, 26 मे : शिवसेनेचे (Shiv Sena) ठाण्यातील बडे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी परिवहन मंत्री अनिल परब...

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता

Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Most Popular

तब्बल 141 दिवस शनि महाराजांची आहे उलटी चाल; या राशीच्या लोकांनी काळजी घ्या

मुंबई, 26 मे : शनीची उलटी चाल कुंभ राशीत सुरू होणार आहे. 05 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Shani Vakri) होईल. रविवार,...

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत आणि संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार हे दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल...

Pune : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची 5 प्रकरणं उजेडात, दोघांचा पर्दाफाश

<p>Pune : रुबी हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची 5 प्रकरणं उजेडात, दोघांचा पर्दाफाश</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15...

Xiaomi च्या 108MP 5G फोनची किंमत झाली लीक, पाहा कितीला मिळणार

नवी दिल्लीः Xiaomi ने गेल्या वर्षी Mi 11X Pro स्मार्टफोनला लाँच करण्यात आले होते. यात Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर दिले आहे. आता या...

Diet For Healthy Skin: त्वचेचा आणि संतुलित आहाराचा आहे जवळचा संबंध, नितळ त्वचेसाठी या टिप्स लक्षात ठेवा

सौंदर्य आणि आहार यांचा खुप जवळचा संबंध आहे. पण, ही गोष्ट अनेक महिलांना माहित नसल्याने त्या आहाराकडे दुर्लक्ष करून केवळ विविध सौंदर्यवृद्धीसाठी उपाय...