Thursday, July 7, 2022
Home करमणूक Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं

Cannes महोत्सवाला गालबोट; विवस्त्र महिलेच्या आक्रोशानं रेड कार्पेट हादरलं


मुंबई : (Cannes) साऱ्या कलाजगताची नजर लागून राहिलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतासोबतच जगभरातील बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जिथं एकिकडे सर्व सेलिब्रिटी फॅशनचे नवनवीन ट्रेंड सेट करत होते, तिथेच एक महिला मात्र या रेड कार्पेटवर विवस्त्र आली आणि तिच्या येण्यानंतर इथे एकच गोंधळ माजला. 

शुक्रवारी कान्समध्ये George Miller’s ‘Three Thousand Years of Longing’ या चित्रपटाचं प्रिमीयर होतं. त्याचवेळी ही विवसस्त्र महिला तेथे आली आणि तिथे तिनं युक्रेनमध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला. 

ती महिला तिथं आली आणि तिनं अंगावर असणारे कपडे काढले. गुडघ्यांवर बसून तिनं त्या ठिकाणी आक्रोश करण्यास सुरुवात केली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. (Topless woman grabs attention at Cannes red carpet video viral )

महिलेनं विवस्त्र होताच तिथे असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी पुढाकार घेत लगेचच या महिलेच्या अंगावर कोट घालण्याचा प्रयत्न केला. या महिलेने तिच्या शरीरावर युक्रेनचा ध्वज रेखाटला होता. सोबतच ‘आमच्यावर बलात्कार करणं थांबा’ असं तिनं छाती आणि पोटाच्या भागावर लिहिलं होतं. 

ज्या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचवेळी तिथं चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते. तेव्हाच आमच्यावर बलात्कार करु नका, असा आक्रोश त्या महिलेनं करण्यास सुरुवात केली होती. 

रशिया युक्रेन युद्धाचे इथेही पडसाद 
युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या कारवाईची सुरुवात झाल्या क्षणापासून तिथं रशियन सैन्याकडून युक्रेनच्या स्थानिक नागरिकांचा छळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

युक्रेनच्या महिलांवर रशियन सैन्याकडून बलात्कार केल्याच्या घटनाही घडल्या ची माहिती समोर आली. हीच घटना पाहता या सर्व अत्याचारांचा निषेध करण्यासाठी म्हणून ही महिला नाईलाजानं रेड कार्पेटवर विवस्त्र झाली. जिथं फॅशनचा उत्सव साजरा होतो, त्या कान्समध्ये एका महिलेचा आक्रोश खूप काही सांगून गेला. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#Cannes #महतसवल #गलबट #ववसतर #महलचय #आकरशन #रड #करपट #हदरल

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

शिंदे गटाचा मोठा नेता राज ठाकरेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यात शिवसेनेला देणार शह?

मुंबई, 06 जुलै : राजकीय सत्तासंघर्षानंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे...

लंडनच्या टॉवर ब्रिजवर अप्सरांनी केलं सिनेमाचं कलरफुल प्रमोशन, पाहा Video

मुंबई 4 जुलै: सध्या मराठीमध्ये एक नवं वादळ येण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्राने राजकीय झुंज तर अनुभवली आता एक दोन पत्रकारांमधली झुंज घेऊन संजय...

Pune Crime News: पाच सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, सहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News: पिंपरी-चिंचवड शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. फॅब्रिकेशन शॉपमध्ये खेळण्याचा मोह एका सहा वर्षीय...

‘काॅफी विथ करण’मध्ये ५ वेळा आली होती आलिया भट्ट,आपल्या लग्नाबद्दल केलेली अचूक भविष्यवाणी

मुंबई : करण जोहरच्या काॅफी विथ करण शोचे प्रोमो व्हायरल झालेत. पहिल्याच भागात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट आहेत. २००४ पासून हा लोकप्रिय...

Special Report : रिक्षावाला विरुद्ध मर्सिडीज, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोप

<p><strong>Rickshaw &nbsp;Vs. Mercedes Special Report</strong> :&nbsp; बंड झालं तेव्हा संजय राऊतांनी जोरदार भाषणं केली. आणि बंडखोरांवर सडकून टीका केली. बंडखोर शिवसैनिकांना त्यांच्या पूर्वश्रमीच्या...

Pune News: पुण्याला पावसाचा फटका! 5 तासात 13 झाडे कोसळली; कोणतीही जिवितहानी नाही

Pune News:  पुण्यात सलग दोन दिवसांपासून पावसाने माध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना आणि बळीराजाला...