Brendon McCullum Salary : न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन आता इंग्लंड क्रिकेट संघाचा कोच होणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत अधिकृत माहिती दिली. दरम्यान यावेळी ब्रेंडन कोच म्हणून कशी कामगिरी करेल, तसंच त्याचा पगार किती याचा अनेक क्रिकेट प्रेमींना प्रश्न पडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेंडनला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून तब्बल 1 मिलियन डॉलर इतका पगार मिळणार आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम जवळपास साडेसात कोटीच्या घरात आहे. विशेष म्हणजे केकेआरचा कोच असताना ब्रेंडनला मिळणाऱ्या पगाराच्या ही किंमत दुप्पट आहे. दरम्यान आता केकेआर संघालाही पुढील हंगामासाठी नवा कोच शोधावा लागणार आहे.
Say hello to our new boss! 👋@Bazmccullum | #EnglandCricket pic.twitter.com/T6CiX5OgE5
— England Cricket (@englandcricket) May 12, 2022
इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन, इंग्लंड पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक मो बाबाटच्या निवड समितीला ब्रेंड मॅक्युलमने प्रभावित केले. त्यामुळेच इतर उमेदवारांपेक्षा ब्रेंडन मॅक्युलमचं वजन जास्त होते. आता इंग्लंड संघाचं कर्णधारपद सांभाळण्यापूर्वी मॅक्युलम आयपीएलमधील केकेआर संघाचे कर्णधारपद सोडणार आहे.
ब्रेंडन मॅक्युलमकडे आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षकपद आहे. तसेच कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनबागो नाईट रायडर्सच्या प्रशिक्षकपदीही तोच आहे. पण इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी तो या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकपादाचा राजीनामा देईल. 2021-2022 मध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी सुधारण्याचं प्रमुख लक्ष मॅक्युलमकडे असेल. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत तळाशी आहे. ‘इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाल्याने आनंदी आहे. संघाला यशस्वी करणे हेच माझे लक्ष्य असेल, असे मॅक्युलम म्हणाला.’
हे देखील वाचा-
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#Brendon #McCullum #इगलडच #नव #परशकषक #बरडन #मकयलमच #पगर #कत