Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या BREAKING : ST महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाहीच! समितीचा अहवाल आला समोर

BREAKING : ST महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नाहीच! समितीचा अहवाल आला समोर


मुंबई, 02 मार्च : एसटी महामंडळ (ST Corporation) राज्य सरकारमध्ये (state government) विलीनीकरण करावे या मागणी तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहे. पण, ‘राज्य एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करता येणार नाही’ असा अहवालच हायकोर्टाने नेमलेल्या समितीने (committee ) दिला असल्याची माहिती समोर आली आहे. विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने दिला आहे.

एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. हायकोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने नेमलेल्या उच्च सदस्यीय समितीने आपला अहवाल कोर्टात सादर केला आहे.  राज्य मंत्रिमंडळात आज मांडण्यात आलेल्या त्रीसदस्य समिती अहवालाची माहिती न्यूज १८ लोकमतच्या हाती लागली आहे.

एसटी महामंडळातील ९३ हजार कर्मचार्यांचं विलीनीकरण राज्य सरकारच्या सेवेत करावं या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी विविध ठिकाणी आजही संपावर आहेत. त्यांच्या मागण्यांवर न्यायालयाने एक त्री सदस्य समिती गठीत केली होती. या समितीने एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करावे  की नाही याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सोपवला आहे.

हा अहवाल आज राज्य मंत्रिमंडळातील बैठकीत पहिल्यांदा मांडण्यात येणार आहे. त्यानंर तो जाहीर केला जाईल. मात्र, न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्य मंत्रिमंडळात आज मांडलेल्या अहवाला एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करण्यात येऊ नये असा अभिप्राय त्रीसदस्य समितीने नोंदवल्याची माहिती मिळत आहे.

राज्य एसटी महामंडळातील 93 हजार एस टी कर्मचारी राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरण करणे व्यावहारिक नसल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे आता एस टी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाचा कायदेशीर मार्ग आता बंद झाला आहे.

राज्यात विविध ठिकाणी आज संपावर असलेल्या एसटी कर्मचारी आणि त्यांच्या संघटना आता काय निर्णय घेत आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Published by:sachin Salve

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#BREAKING #महमडळच #सरकरमधय #वलनकरण #शकय #नहच #समतच #अहवल #आल #समर

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

ENG VS IND, 1st T20 : टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, कोण जिंकणार?

साउथम्पटन : कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर आता टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिकेत (Eng vs Ind 1st T20I) आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध...

Food For Healthy Lungs : निरोगी फुफ्फुसासाठी आहारात या 5 पदार्थांचा समावेश कराच, कधीच आरोग्याची कोणतीच दुखणी डोकं वर करणार नाहीत

Healthy Diet For Lungs : नॅशनल हार्ट, ब्लड आणि लंग इन्स्टिट्यूट ट्रस्टेड सोर्सच्या मते, क्रॉनिक लोअर रेस्पीरेटरी डिसीज - क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज...

काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहिती नाही, उद्धव ठाकरेंचे खोचक चिमटे

मुंबई, 5 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांसाठी निवडणुकीत 100...

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅन कार्डचे काय करायला हवे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली :Pan Card Rule: आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ड, मतदान ओळखपत्रासारखी महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे....