Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या BREAKING : ST कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार कोर्टाचा दणका

BREAKING : ST कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार कोर्टाचा दणका


मुंबई, 17 जानेवारी : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील दोन महिन्यांपासून संपावर (st bus workers protest) असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज आणखी एक धक्का बसला आहे. वांद्रे कामगार न्यायालयाने (bandra labor court) एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत दणका दिला आहे.

गावागावात धावणारी लालपरी अर्थात एसटी बसची चाकं गेल्या दोन महिन्यांपासून रुतलेली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात काही ठिकाणी फूट पडली आहे. त्यामुळे काही कर्मचारी हे कामावर परतले आहे. पण अजूनही काही ठिकाणी कर्मचारी संपावर ठाम आहे. या संपाच्या विरोधात एसटी महामंडळाने वांद्रे कामगार न्यायालयात धाव घेतली होती. कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर ठरवला आहे.

‘एसटी बस ही लोकोपयागी सेवा आहे. पण संप करण्याआधी किमान 6 आठवडे नोटीस द्यावी लागते. पण, कामगारांकडून अशी कोणताही नोटीस दिली गेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर आहे, असा निर्णया वांद्रे कामगार न्यायालयाने दिला आहे.

(ठिपक्यांची रांगोळी : अपूर्वा-शशांकच्या हळदीसाठी पोहोचले खास पाहुणे)

दरम्यान, १० जानेवारी रोजी एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर कामगार संघटनेनं संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक आगारात कर्मचारी कामावर परतले आहे.

तसंच,  लालपरी रस्त्यावर आली असून 250 डेपोतील 215 डेपो सुरू आहे . 26500 कर्मचारी कामावर हजर झाले आहे.  92 हजारातील 3123 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहे. आणि सध्या 88 हजार कर्मचारी पटावर यातील 26500 कर्मचारी आहे. राज्यात दिवसभरात लालपरीच्या 7 हजार फेऱ्या सुरू असून  3 लाख 88 हजार प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
(पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहून तरुणाचा संताप; आरोपीला स्फोटात थेट उडवूनच टाकलं!)
2 महिन्यांपासून संप सुरू, दररोज रुजू होणाऱ्या कर्मचारी संख्येत वाढ  होत आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची कोणतीही प्रक्रिया नाही, निलंबित कर्मचाऱ्यांना 3 वेळा आवाहन केलं जे कामावर आले त्यांचं निलंबन रद्द केलं. लोकांना सेवा देणं आवश्यक असल्यानं 700 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतलंय, ही नियुक्ती 1 महिन्यांसाठी आहे.  चंद्रपूर,वर्धा,अकोला,बीड,अमरावती, नाशिक,पुणे,बीड येथे खाजगी कर्मचारी कामावर आहे. सेवानिवृत्त 400 कर्मचारी सेवेत येण्यास इच्छुक आहे. यातील वय 62 पर्यंतचे 100 सेवानिवृत्त कर्मचारी रुजू मेडिकल,फिटनेस चेक करून कामावर घेतलं जातंय, असंही चन्ने यांनी सांगितलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#BREAKING #करमचऱयच #सप #बकयदशर #कमगर #करटच #दणक

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

लेक आणि सूनेत नीतू कपूर करतायेत भेदभाव? आलियाच्या प्रेग्नेंसीनंतर अखेर सत्य समोर

'कहानी घर घर की...', लेक आणि सूनेत नीतू कपूर करतायेत भेदभाव?   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरूच, पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain Update: मुंबईत आजही जोरदार पाऊस सुरूच आहे. विशेष म्हणजे मंगळवारी मोठा पाऊस होऊनही ज्या हिंदमाता परिसरात...

USच्या डॉक्टरांचा चमत्कार! कॅन्सबाधित महिलेला मरणाच्या दारातून वाचवलं

लंडन, 05 जुलै:  महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं (Breast Cancer) वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. एकदा का हा आजार झाला की केमोथेरपीमुळे पेशंटवर (Chemotherapy) पुरते त्रस्त...

ENG VS IND, 1st T20 : टीम इंडिया-इंग्लंड आमनेसामने, कोण जिंकणार?

साउथम्पटन : कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर आता टीम इंडिया-इंग्लंड टी 20 मालिकेत (Eng vs Ind 1st T20I) आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध...

Tu Tevha Tashi: माझी मम्मा फक्त माझीये! राधा स्वीकारणार का सौरभ अनामिकाचं नात?

मुंबई, 5 जुलै: झी मराठीवरील ( Zee Marathi) 'तू तेव्हा तशी' ( Tu Tevha Tashi) हि मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे....